घरलाईफस्टाईल'नाश्ता' करताना हे पदार्थ नक्की टाळा

‘नाश्ता’ करताना हे पदार्थ नक्की टाळा

Subscribe

न्याहरी करतेवेळी काही पदार्थ खाणं आपण आवर्जून टाळायला हवं. या पदार्थांमुळे आपलं पोट भरत असलं तरी पुढे त्याचा शरीराला त्रास होऊ शकतो.

आहार तज्ज्ञांच्या मते, सकाळी भरपेट नाश्ता करणं शरीराच्या आणि पर्यायाने आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्वाचं असतं. मात्र, अनेकदा पोटभर नाश्ता करण्याच्या नादात आपण काही अनावश्यक पदार्थ खातो. ज्या पदार्थांची भलेही आपल्या शरीराला त्यावेळी गरज असते. मात्र, पुढे जाऊन आपल्याच आरोग्याला यामुळे अपाय होण्याची शक्यता असते. चला जाणून घेऊया, नेमके कोणते पदार्थ आपण न्याहरीमध्ये टाळले पाहिजेत.

नाश्त्यामध्ये फळं खाणं उत्तम. मात्र संत्र्यासारखी आंबट फळं खाणं टाळावं. सकाळाच्यावेळी जास्त खाल्लेली आंबट फळं दिवसभर आपल्यासाठी त्रासदायक ठरु शकतात.

- Advertisement -


नाश्त्यामध्ये तुम्ही ग्लासभर फळांचा ज्यूस पित असाल, तर ते आवर्जून टाळा. कारण फळांमध्ये मुळातच खूप साखर असते. ज्यूस बनवतेवेळी आपण त्यात जास्तीची साखर मिसळतो. इतक्या प्रमाणात शुगर शरीरासाठी चांगलं नसतं.


‘हेवी ब्रेकफास्ट’ करायचा म्हणून बर्गर, पिझ्झा सारखं जंक फूड अजिबात खाऊ नका. या पदार्थांमध्ये ब्रेड जास्त प्रमाणात असतो. ब्रेडमधील मैदा आणि ईस्ट हे घटक शरीरासाठी अपायकारक असतात.

- Advertisement -


ब्रेड-बटर, ब्रेड-जॅमसारखे पदार्थही नाश्त्यामध्ये टाळा. या पदार्थांमध्ये असलेले अतिरीक्त कार्बोहायड्रेट शरीरासाठी चांगले नसतात.

पेस्ट्री आणि डोनट्स यांसारखे पदार्थही टाळा. या पदार्थांमुळे रक्तातील शुगर जास्त प्रमाणात वाढते.
थोडक्यात न्याहरीमध्ये पचायला हलके असलेले आणि ताजे पदार्थच खा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -