Monday, January 20, 2025
HomeमानिनीRelationship Tips : नात्यात अंतर न येण्यासाठी लक्षात ठेवा या गोष्टी

Relationship Tips : नात्यात अंतर न येण्यासाठी लक्षात ठेवा या गोष्टी

Subscribe

पती पत्नीच्या नात्यात कधी जीवापाड प्रेम दिसते तर कधी संर्घष. यात चढ-उतार येत असतात. कधी कधी कळत नकळत नात्यात घडणारी एखादी गोष्ट पती पत्नीमध्ये भेदभाव निर्माण करणारी ठरू शकते. नाते टिकवण्यासाठी दोघांकडून प्रयत्न असणे आवश्यक असते. त्याचप्रमाणे नातं अधिक दृढ करण्यासाठी अनेक गोष्टीची काळजी घेणेही आवश्यक असते. त्यामुळे जाणून घेऊयात अशा गोष्टी ज्या पाळल्या तर नात्यात दूरावा निर्माण होत नाही.

एकमेकांना वेळ द्या –

नात्यात अंतर येऊ नये असे वाटत असेल तर एकमेकांना वेळ देणे आवश्यक आहे. आजकाल आयुष्य धावते झाले आहे. आजच्या बिझी लाइफस्टाइलमुळे, नोकरी करणाऱ्या पती पत्नीला एकमेकांसाठी वेळ काढणे कठीण झाले आहे. पण, आपण कितीही व्यस्त असलो तरी नात्यात एकमेकांना वेळ न देणं हे चुकीच आहे. एकमेकांना पुरेसा वेळ न दिल्याने नात्यात दुरावा निर्माण होतो, ज्यामुळे भविष्यात नाते कमकुवत होऊ शकते. त्यामुळे कितीही व्यस्त असाल तरी दिवसातून थोडातरी वेळ जोडीदाराला देणं आवश्यक आहे. दर वेळी डेटवर जाणे, फिरायला जाणे म्हणजेच एकमेकांसाठी वेळ काढणे नाही, तुम्ही घरातही घरची कामे करत एकमेकांना वेळ देऊ शकता.

संवाद महत्त्वाचा –

नात्यात अंतर येऊ नये असे वाटत असेल एकमेकांशी बोलणे आवश्यक आहे. जोडीदाराचे वागणे बोलणे पटत नसेल , एखादी गोष्ट खटकत असेल तर अशा परिस्थितीत तुम्ही त्याच्याशी मोकळेपणाने बोलायला हवे. मोकळेपणाने न बोलल्याने एकमेकांविषयी गैरसमज निर्माण होऊ शकतात. गैरसमज हे नाते कमकुवत करण्यासाठी पुरेसे असते. त्यामुळे तुमच्या भावना, कल्पना, विचार हे एकमेकांशी मनमोकळेपणाने बोलणे आवश्यक आहे, हेच निरोगी नात्याचे लक्षण आहे.

चूक मान्य करा –

अनेकवेळा चूक मान्य न करणे, नात्यात अंतर निर्माण होण्याचे कारण बनू शकते. कित्येकजणांचा असा स्वभाव असतो की, चूक झाली तरी मान्य करीत नाही किंवा आपली चूक मान्य करायला कचरतात. पण, अशाने जोडीदाराच्या भावना दूखावल्या जाऊ शकतात, हे आपण लक्षात घेत नाही. आपला अहंकार आडवा येतो. पण, निरोगी नात्यासाठी असे वागणे बदलणे गरजेचे आहे. जर चूक झाली असेल तर मान्य करा आणि जोडीदाराला सॉरी म्हणा. तुमच्या छोड्याशा सॉरीने तुमच्यात अंतर आणि गैरसमज निर्माण होणार नाहीत.

 

 

 

 

हेही पाहा –


Edited By – Chaitali Shinde

Manini