आजकाल तरुणांमध्ये ऑनलाइन गेमचा क्रेज खूप वाढत चाला आहे. इंटरनेट आणि स्मार्टफोनच्या सहज उपलब्धतेमुळे गेमिंग हा केवळ विरंगुळ्याचा भाग राहिला नसून, तो करिअर आणि स्पर्धात्मक क्षेत्र म्हणूनही उदयास आला आहे. PUBG, Free Fire, BGMI यांसारख्या गेम्सला विशेष लोकप्रियता मिळाली आहे. बऱ्याचदा ऑनलाइन गेम खेळताना आपलं लक्ष नसत अशावेळी खूप मोठी चूक होऊ शकते. आज आपण जाणून घेऊयात ऑनलाइन गेम खेळताना कोणत्या चुका टाळाव्यात.
ऑनलाइन गेम खेळताना या गोष्टी लक्षात ठेवा
चीट कोड पासून सावधान
जर तुम्ही ऑनलाइन गेम खेळत असाल तर चीट कोड पासून सावधान राहा. जेव्हा आपण एखादा गेम खेळतो आणि एका अवघड टप्प्यावर अडकतो तेव्हा आपल्याला एक पर्याय दिसतो. आपण पैसे भरून ती लेव्हल पार करू शकतो. बरेच लोक लेव्हल पार करण्यासाठी असं करतात आणि अशा प्रकारे त्यांची फसवणूक केली जाते . हॅकर्स हे असे अनेक पर्याय पाठवतात किंवा ऑफर्सची मदत घेतात त्यामुळे या पर्यायांपासून दूर राहा.
वैयक्तिक माहिती
ऑनलाइन गेम रजिस्टर करताना आपली वैयक्तिक माहिती देऊ नका. हॅकर्स तुमची ही माहिती गोळा करून त्याचा गैरवापर करू शकतो. हे तुम्हाला कळणार देखील नाही. त्यामुळे तुमची पर्सनल माहिती कोणत्याही ऑनलाइन गेम खेळताना देऊ नका.
ऑफिशल गेमिंग अकाउंट सोर्स
कोणताही ऑनलाइन गेम डाउनलोड करताना ऑफिशल गेमिंग अकाउंट असलेले गेम सोर्सचा वापर करा. कोणत्याही वेबसाइड गेम डाउनलोड करू नका याने तुमचा संपूर्ण डेटा हॅक होऊ शकतो.
स्ट्रॉंग पासवर्ड ठेवा
जर तुम्हाला ऑनलाइन गेम खेळायला आवडत असेल आणि तुमचे अनेक अकाउंट्स असतील तर तुम्ही एक स्ट्रॉंग पासवर्ड ठेवा. जेणेकरून तुमचं अकाउंट हॅक होणार नाही. पासवर्ड सेट करताना नेहमी 16 कॅरेक्टरचा वापर करा.स्पेशल कॅरेक्टर नंबरचा देखील वापर करा.
लिंक क्लिक करू नका
कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका. लिंकवर केल्याने तुमचा संपूर्ण डेटा हॅक होऊ शकतो.
सायबरबूली पासून सावधान रहा
आजकाल सायबर गुन्हेगारी खूप वाढत चाली आहे. ऑनलाइन गेममुळे देखील याचे प्रमाण खूप वाढलं आहे. काही लोक या गेमिंग प्लॅटफॉर्मवर अपशब्द वापरतात आणि इतर खेळाडूंना धमकावण्याचा प्रयत्न देखील करतात. जर कोणी ऑनलाइन गेम खेळताना तुमच्याशी असे वागत असेल तर तुम्ही त्यांचं अकाउंट रिपोर्ट करू शकता.
हेही वाचा : QR Code : QR कोड खरा की बनावट कसा ओळखाल?
Edited By : Prachi Manjrekar