आपला लूक परिपूर्ण आणि सुंदर बनवण्यासाठी मेकअप अत्यंत महत्वाचा भाग आहे. कोणत्याही खास समारंभात मेकअपमुळे आपल्या लूकचे सौंदर्य अजून द्विगुणित होते. बऱ्याचदा अनेकजण मेकअप करताना काही चुका करतात. या चुकांमुळे आपला लूक खराब होऊ शकतो आणि त्वचेला हानी पोहाेचू शकते. या चुका होऊ नये यासाठी आज आपण जाणून घेऊयात, मेकअप करताना कोणत्या चुका टाळाव्या.
चेहरा धुतल्यावर मेकअप करू नका
चेहरा धुतल्यावर आपली त्वचा कोरडी पडते. अशावेळी तुम्ही मेकअप केल्याने तुमचा चेहरा अधिक कोरडा होऊ शकतो. तुम्हाला पुरळ किंवा चेहऱ्यावर डाग येऊ शकतात.
मॉइश्चरायझ
मेकअप करण्यापूर्वी चेहरा मॉइश्चरायझ करणे अत्यंत गरजेचं आहे. मॉइश्चरायझ केल्याने आपली त्वचा मऊ आणि तजेलदार होईल. त्यामुळे मेकअप करण्यापूर्वी चेहरा नीट मॉइश्चरायझ करून घ्या.
केमिकल-मुक्त प्रॉडक्ट्स
बऱ्याचदा मेकअप प्रॉडक्ट्समुळे चेहऱ्यावर मुरुम किंवा डाग येतात. यामागचं कारण म्हणजे यामध्ये मोठ्या प्रमाणात केमिकल्सचा वापर केला जातो. त्यामुळे आपल्याला ऍलर्जी किंवा इतर त्वचेचे आजार होण्याची संभाव्यता वाढते.
मेकअप करताना ऋतू लक्षात घेणे
मेकअप करताना ऋतू लक्षात घेणे अत्यंत गरजेचं आहे. यामागचं कारण म्हणजे प्रत्येक ऋतूमध्ये त्वचेची परिस्थिती वेगवेगळी असते. त्यामुळे, मेकअप करताना त्या ऋतूच्या परिस्थितीला अनुसरून मेकअप करणे आवश्यक आहे. उन्हाळ्यात घामामुळे मेकअप खराब होतो. त्यामुळे, वॉटरप्रूफ मेकअप वापरणे चांगले आहे. हिवाळ्यात त्वचा कोरडी पडते आणि टॅन येतो. त्यामुळे, त्वचा मॉईस्चराईज करणे आणि दिवसभर पाणी पिणे गरजेचे आहे.
सनस्क्रीन लावा
मेकअप करताना सनस्क्रीन लावा. सनस्क्रीनमुळे मेकअपचा बेस स्थिर राहतो . आपली त्वचा मेकअपमुळे काळपट देखील पडणार नाही.
मेकअप स्प्र्ये वापरा
मेकअप दीर्घकाळ टिकण्यासाठी मेकअप सेटिंग स्प्र्येचा वापर करा . याने तुमचा मेकअप दीर्घकाळ राहील आणि खराब देखील होणार नाही.
हेही वाचा : Benefits Of Face Massage : फेस मसाज का करावा?
Edited By : Prachi Manjrekar