घरलाईफस्टाईलदिवसा झोपल्याने खरंच नुकसान होते का, काय सांगतं आयुर्वेद?

दिवसा झोपल्याने खरंच नुकसान होते का, काय सांगतं आयुर्वेद?

Subscribe

आरोग्य निरोगी राहण्यासाठी योग्य आणि सकस आहाराची गरज असते तशी पुरेश्या झोपेची सुद्धा गरज असते. पण जर का वेळी अवेळी किंवा दिवसा झोप घेतल्याने त्याचा तुमच्या आरोग्यावर चुकीचा परिणाम होईल.

आपल्या रोजच्या जीवनशैलीमध्ये कामाच्या धावपळीत काही सवयी आपल्या लागतात. पण या सवयी काही वेळा चांगल्या असतात तर काही वेळा त्या चुकीच्या असतात. प्रत्येक व्यक्ती आपापल्या परीने आपल्या आरोग्याची काळजी घेत असते. त्याचबरोबर आपलं आरोग्य निरोगी राहण्यासाठी योग्य आणि सकस आहाराची गरज असते तशी पुरेश्या झोपेची सुद्धा गरज असते. पण जर का वेळी अवेळी किंवा दिवसा झोप घेतल्याने त्याचा तुमच्या आरोग्यावर चुकीचा परिणाम होईल. प्रत्येक
व्यक्तीला निरोगी आयुष्य जगण्यासाठी काही चांगल्या सवयी अंगवळणी करून घ्याव्या लागतात. आयुर्वेदा(ayurveda) मध्ये चांगल्या आरोग्यासाठी अनेक चांगल्या सवयींबाबत सांगण्यात आलं आहे. निरोगी आणि सुधृढ आरोग्यासाठी आयुर्वेदामधल्या काही गोष्टींचा अवलंब केल्यास त्याचा नक्कीच चांगला परिणाम तुमच्या आरोग्यावर होईल.

उत्तम आरोग्यासाठी वेळच्या वेळी जेवण, झोप आणि व्यायाम या सर्व गोष्टी केल्या पाहिजेत. खाणं, पिणं, झोपणं या संदर्भात काही चुकीच्या सवयी तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरतात. त्याचप्रमाणे दिवस झोपणं हे आयुर्वेदामध्ये चुकीचं आहे असं सांगण्यात आलं आहे. त्या मुळे शरीरावर चुकीचा परिणाम होण्याची शक्यता असते. काय आहेत त्याची करणं जाणून घ्या…

- Advertisement -

आयुर्वेदानुसार(ayurveda) दिवसा झोपल्याने कफ वाढतो आणि वात कमी होतो. अश्याने कफामुळे होणाऱ्या आजारांचा त्रास वाढतो. पण वात असलेल्या लोकांना दिवसा झोपल्याने फायदा होऊ शकतो. पण जर का केव्हा केव्हा थकवा आल्याने किंवा कामाच्या ताणामुळे तुम्ही दिवसातून १५ ते २० मिनिटे अराम करू शकता. पण झोपणं चांगलं नाही

या लोकांनी दिवसा झोपू नये

- Advertisement -

– जर तुमचे वजन जास्त असेल आणि जरा का ते तुम्हाला कमी करायचे असेल, तुम्हाला बरीक व्हायचे असेल तर अश्या व्यक्तींनी दिवसा झोपू नये

– ज्या व्यक्तींना तेलकट किंवा मैद्यापासून बनविलेले पदार्थ खायला आवडत असतील किंवा अश्या पदार्थांचे सेवन जास्त प्रमाणात होत असेल तर अश्या व्यक्तींनी दिवसा झोपणं टाळलं पाहिजे

– तुम्ही जर का फिटनेस फ्रीक आहात आणि त्याचबरोबर भावनिक , मानसिक आरोग्या बाबतही जागरूक आहात तर त्यांनी दिवसा झोपणं टाळावं

– ज्या लोकांना कफाचा त्रास आहे अश्या व्यक्तींनीही दिवसा झोपू नये

– ज्यांना डायबेटीस किंवा हायपोथायरॉईडची समस्या आहे अश्या व्यक्तींनीही दिवसा झोपू नये

हे ही वाचा – दह्यासोबत ‘हे’ ५ पदार्थ खाणे टाळा, फायद्याऐवजी होईल तोटा

हे लोक दिवसा झोपू शकतात

– खूप बारीक आणि कमकुवत लोक दिवसा झोपू शकतात.

– ज्या व्यक्तींवर शस्त्रक्रिया झालेली असेल किंवा ज्या व्यक्ती आजारी असतील अशी लोकं दिवसा झोपू शकतात.

– ज्या महिलांची प्रसूती झाली असेल त्या महिला

– काही मेहनतीचे काम झाले आहेत किंवा प्रवासादरम्यान तुम्ही शारीरिक आणि मानसिक स्तरावर थकले असाल तर तुम्ही दिवसा आराम मिळेपर्यंत झोपू शकता.

– आयुर्वेदानुसार ज्यांचे वय १० वर्षांपेक्षा कमी आहे आणि ज्यांचे वय ७० वर्षांपेक्षा जास्त आहे, ते दिवस झोप घेऊ शकतात.

हे ही वाचा – Burger Recipe: घरच्या घरी बनवा झटपट बर्गर

यामधून वाचकांपर्यंत माहिती पोहोचविण्याचा उद्देश आहे. यातून आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं या सगळ्या गोष्टी करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या फॅमिली डॉक्टरचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेऊन करू शकता.

 

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -