घरलाईफस्टाईलवजन कमी करण्यासाठी आयुर्वेदिक उपाय

वजन कमी करण्यासाठी आयुर्वेदिक उपाय

Subscribe

जर तुमचं वजन सारखं वाढत असेल आणि त्यामुळं तुमच्या कबंरेची साइज ही ३२ हून ३६ झाली असेल तर आताच सावधान व्हा... कंबरेचं आणि पोटाचं वाढणं हे तुमच्या आजाराला आमंत्रण आहे, त्यामुळं खूप समस्या उद्भवू शकतात. तुम्हाला लठ्ठपणाची समस्या आहे तर असे काही छोटे-छोटे आयुर्वेदिक उपाय केल्यानं वजन नियंत्रित करता येतं.

* भाजी आणि फळांमध्ये कॅलरी कमी असतात त्यामुळं त्यांचे सेवन जास्त प्रमाणात करावे. केळ आणि चिकू कमी प्रमाणात खावे कारण त्याने लठ्ठपणा वाढतो.

* जेवताना टॉमेटो आणि कांदाच्या कोशिंबीरमध्ये मिरे आणि मीठ घालून खावे. त्यानं शरीराला विटामिन सी, ए, के, लोह, पोटॅशिअम, लायकोपिन आणि ल्यूटिन मिळतं.

- Advertisement -

* ताज्या पुदिन्याच्या पानांची चटणी करून चपातीसोबत खावी. पुदिन्याचा चहा प्यायल्यास वजन नियंत्रित राहतं.

* जेवणापूर्वी गाजर खावे. जेवणापूर्वी गाजर खाल्यास भूक कमी होते.

- Advertisement -

* एका कपात उकळत्या पाण्यात अर्धा चमचा बडिशेप टाका. १० मिनिटं त्याला झाकून ठेवा. थंड झाल्यानंतर ते पाणी प्यावं. तीन महिने असे नियमित केल्यास वजन कमी होते.

* हिरडा आणि बेहड्याचं चूर्ण बनवा. एक चमचा चूर्ण ५० ग्रॅम परवलच्या रसासोबत नेहमी घ्या, वजन मोठ्या प्रमाणात कमी होण्यास सुरुवात होईल.

कारल्याची भाजी खाल्यास वजन कमी होण्यास मदत होते.

* शेवग्याचा नियमित वापर केल्यास वजन नियंत्रित राहतं.

* सुंठ, दालचिनीच्या साली आणि काळी मिरे (३-३ ग्राम) बारीक करून चूर्ण बनवावं. सकाळी रिकाम्या पोटी आणि रात्री झोपण्यापूर्वी हे चूर्ण खावं.

* पपई नियमितपणे खावी. पपई सगळ्या सीजनमध्ये मिळते. खूप दिवस पपई खाल्ल्यास कंबरेची चरबी कमी होते.

* जेवणामध्ये दही खाल्ल्यास चरबी कमी होते. ताकही दिवसांतून दोन-तीन वेळा प्यावं.

* आवळा आणि हळद समप्रमाणात घेऊन बारीक चूर्ण करावं. हे चूर्ण ताकासोबत घेतल्यास कंबर एकदम सुबक होते.

* लेंडी पिंपळी बारीक करून कपड्यावर साफ करावी. हे चूर्ण तीन ग्राम नेहमी ताकासोबत घ्यावं त्यानं बाहेर आलेलं पोट कमी होतं.

* मुळांचा रस आणि मध सम प्रमाणात पाण्यासोबत मिसळून प्यावा, असं केल्यानं एक महिन्यात लठ्ठपणा कमी होतो.

* नेहमी सकाळी एक ग्लास पाण्यात दोन चमचे मध मिसळून प्यावा, असं केल्यानं चरबी कमी होते.

* कोबीचा ज्यूस प्यावा, याने सुध्दा चरबी कमी होते.

* एक चमचा पुदीन्याच्या रसामध्ये २ चमचे मध मिसळून प्यायलास लठ्ठपणा कमी होतो.

* सकाळी उठल्यावर २५० ग्राम टोमॅटोचा रस २-३ महिने नियमित प्यावा चरबी कमी होण्यास मदत होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -