घर लाईफस्टाईल आयुर्वेदिक शतावरी महिलांसाठी खरी सोबतीण

आयुर्वेदिक शतावरी महिलांसाठी खरी सोबतीण

Subscribe

शतावरीचा वापर बर्‍याच वर्षांपासून वेगवेगळ्या प्रकारे आणि वेगवेगळ्या कारणांसाठी केला जात आहे. पण शतावरी वापरण्यापूर्वी त्याबद्दल आणि त्याचा उपयोग कसा होतो, तसेच त्याचे फायदे काय आहेत हे जाणून घेणे आवश्यक आहे. आपल्यापैकी कोणीही आपल्या जीवनातील तणाव आणि चिंतापासून मुक्त झाले नाहीत. वर्क-लाइफ बॅलन्स, वैयक्तिक समस्या किंवा तुम्हाला योग्य वाटत नसलेल्या कोणत्याही गोष्टींमुळे तणाव देखील येऊ शकतो. तसेच यावर उपाय म्हणून शतावरीचे सेवन करणे अतिशय फायदेमंद मानले जाते. चला तर मग शतावरीच्या फायद्यांविषयी अधिक माहिती जाणून घेऊया.

White Shatavari Roots

  • तापामध्ये शतावरीचे अनेक फायदे तुम्ही घेऊ शकता.
  • शतावरीच्या मुळाचा ज्यूस प्यायल्याने सर्दी आणि फ्लू कमी होतो.
  • तसेच सर्दी आणि तापामध्ये शतावरी खूप गुणकारी आहे.
  • गर्भवती महिलांसाठी शतावरी खूप फायदेशीर आहे.
  • शतावरी मुळापासून कोरडी पावडर बनवा.
  • ही शतावरी पावडर 2 ग्रॅम बकरीच्या दुधासोबत किंवा गायीच्या दुधासोबत घेतल्याने मुल निरोगी होते.
  • बरेच लोक झोपच येत नसल्याची तक्रार करतात.
  • यासाठी शतावरीची पावडर दुधात उकळून घ्या आणि त्यात तूप मिसळून त्याचे सेवन केल्यास निद्रानाशापासून मुक्ती मिळेल आणि छान झोप येईल.
  • आयुर्वेदानुसार शतावरी या वनस्पतींने तुम्ही आरामात वजन घटवू शकता.
  • थंड प्रकृती असलेल्या ही जडीबुटी पित्त कमी करण्यासही मदत करते.
  • अशातच जर का तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर फक्त एक महिना शतावरीचे रेगुलर सेवन केल्यास तुमचे वजन झपाट्याने कमी होईल.
  • शतावरीमध्ये अँटी ऑक्सिडेंट गुण असतात. त्यामुळं हृदय, किडनी आणि डोळ्यांचे आरोग्य सुधारते.
  • शतावरीचे सेवन केल्यास लठ्ठपणावर नियंत्रण मिळवू शकता.
  • शतावरीमध्ये सॉल्युबल आणि इनसॉल्युबल फायबर आढळतात.
  • जे वजन कमी करण्यास फायद्याचे ठरतात.
  • विशेष म्हणजे या औषधी वनस्पतीचे सेवन केल्यास मेटाबॉलिज्म बूस्ट होते आणि जास्त वजन असेल तर ते सुद्धा घटते.
  • शतावरी पावडरमध्ये पोषक अनेक पोषक तत्वे आहेत.
  • तसेच यात असलेले प्रोटीन, आयरन, फायबर आणि सोडियम असते.
  • जे शरीरातील पोषक तत्वांची कमतरता भरून काढते आणि शरीरातील हार्मोन्स कंट्रोल करते.
  • त्यामुळं महिलांनी या औषधी वनस्पतीचे सेवन अवश्य केले पाहिजे.
  • शतावरीचे सेवन केल्यास मासिक पाळीतील दुखणेही कमी होते आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवते.

हेही वाचा :

प्रेग्नेंसीपूर्वी ‘या’ गोष्टींकडे लक्ष द्या

- Advertisement -

 

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -