लहान मुलांचे दात दिसू लागताच पालकांना एक प्रश्न सतावतो तो म्हणजे मुलांना टूथब्रश द्यावा की नाही? तुम्हालाही अशाच प्रश्न पडला असेल तर ही बातमी तुमच्यासाठी. मुलांना ब्रश देण्यासाठी कोणत्या वयात मुलांनी टूथब्रश वापरावा हे पालकांनी समजून घेणे आवश्यक आहे. जेणेकरून मुलांच्या दातांना कोणत्याही प्रकारची इजा होणार नाही.
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, मूल जेव्हा 8 ते 12 महिन्यांचे होते, तेव्हा मूल मोठ्यांकडे पाहून गोष्टी समजून घेऊ लागतो. या वयात त्याचे दातही यायला सुरुवात होते. अशावेळी तुमच्या निगराणीखाली त्यांना तुम्ही टूथब्रश वापरायला देऊ शकत. पण, बाळ 18 महिन्यांचे होईपर्यत कोणतीही टूथब्रश लहान देऊ नये. यामागचे कारण म्हणजे 18 महिन्यांपेक्षा लहान मूल टूथपेस्ट थुंकू शकत नाही उलट बाळ टूथपेस्ट गिळण्याची शक्यता अधिक असते. जर बाळाने टूथपेस्ट गिळली तर आरोग्यासाठी किती हानिकारक ठरू शकते हे वेगळे सांगण्याची गरज नाही.
दुसरे गोष्ट म्हणजे मुलांना टूथपेस्ट देताना भरपूर प्रमाणात देऊ नये नाहीतर मूल टूथपेस्ट खाऊ लागेल. लहान मुलांना टूथपेस्ट देताना त्याचे प्रमाण हे वाटाण्याच्या दाण्यापेक्षा जास्त नसावे. तुमचे बाळ अगदी 4 वर्षांचे होईपर्यंत टूथपेस्टचे प्रमाण इतकेच असावे.
पुढील गोष्टी लक्षात ठेवा –
- 3 वर्षांपेक्षा लहान मुलांसाठी फिंगर स्लिप ब्रश वापरावा.
- मूल टूथपेस्ट गिळणार नाही याची काळजी घ्या.
- दिवसातून कमीत कमी 2 वेळा मुलाला ब्रश करण्याची सवय लावा.
हेही पाहा : बाळांना असते अंगठा चोखण्याची सवय, हे आहे कारण… I Babies have a habit of thumb sucking
Edited By – Chaitali Shinde