Sunday, June 11, 2023
घर मानिनी Relationship वयाच्या चाळीशीनंतर ही होऊ शकता आई-बाबा

वयाच्या चाळीशीनंतर ही होऊ शकता आई-बाबा

Subscribe

बदलत्या लाइफस्टाइलमुळे सध्या प्रत्येकजण धावपळीचे आयुष्य जगत आहे. त्यामुळे करियरला अधिक महत्व देणाऱ्या मंडळी वयाच्या ३५-४० व्या वयात ही लग्न करण्याचा निर्णय घेतात. वैवाहिक आयुष्यात सेटल होण्यासह बेबी प्लॅनिंग करण्यासाठी कधी जवळजवळ ३-४ वर्ष अशीच निघून जातात हे कळत नाही. काही वेळेस योग्य वयात लग्न न केल्यास वर्षानुवर्ष बेबी कंसीव न होण्याची सुद्धा काही महिलांना समस्या येऊ शकते.

परंतु जर वयाच्या चाळीनंतर ही तुम्ही बेबी प्लॅन करत असाल तर काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. प्रथम त्यासाठी डॉक्टरांना भेटा. ते तुम्हाला काही मेडिकल चाचण्या करण्यास सांगतील. तसेच तुम्हाला प्रेग्नेंसी दरम्यान काय समस्यांचा सामना करावा लागेल हे सुद्धा सांगतील.

- Advertisement -

खरचं वयाच्या चाळीशीत ही आई-बाबा होऊ शकतो का?
खरंतर हे शक्य आहे. एक महिला वयाच्या चाळीशीनंतर ही आई होऊ शकते. पण काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. कारण वाढत्या वयासह आई होण्याची संभावना कमी होते. नैसर्गिकरित्या जी लोक कंसीव करु शकत नाहीत त्यांच्याकडे काही वेगळे सुद्धा पर्याय आहेत. जसे की, IVF, स्पर्म आणि एगची क्वालिटी उत्तम नसेल किंवा ते तयार होऊ शकत नाहीत तर त्यावर उपाय करु शकता. असे करुन सुद्धा काही होत नसेल तर तुम्हाला डोनरची मदत घ्यावी लागेल.

- Advertisement -

टेक्नॉलीजेने प्रेग्रेंसीची प्रक्रिया सोप्पी केली आहे. जस जसे वय वाढते, मिसकॅरेजसोबत मुलांमध्ये जन्मजात आजार होण्याची शक्यता ही वाढते. यामुळेच प्रीटर्म किंवा सिजेरियन डिलिवरचा ऑप्शन अगदी सामान्य असतो. मधुमेह, उच्च रक्तदाब, तणाव सारख्या समस्येमुळे वयाच्या चाळीनंतर प्रेग्नेंसीचा प्लॅन करणे हा अधिक रिस्कचा ठरु शकतो.


हेही वाचा- ‘या’ फूड्समुळे वाढू शकतात Labour Pain

- Advertisment -

Manini