Tuesday, May 30, 2023
घर मानिनी Health 'या' 5 कारणांमुळे सतत दुखते कंबर, महिलांनो वेळीच लक्ष द्या

‘या’ 5 कारणांमुळे सतत दुखते कंबर, महिलांनो वेळीच लक्ष द्या

Subscribe

कंबर दुखी किंवा पाठ दुखीच्या समस्येमुळे बहुतांश जण त्रस्त असतात. ही समस्या सध्या सर्वसामन्य झाली आहे. पाठ किंवा कंबर दुखण्याची समस्या खरंतर वयाच्या चाळीनंतर सुरु होते. पण एका संशोधनानुसार ही समस्या पुरुषांपेक्षा महिलांमध्ये अधिक होत असल्याचे दिसून आले आहे. महिलांमध्ये तर कोणत्याही वयात ही समस्या होऊ शकते. बदलती लाइफस्टाइल आणि खाण्यापिण्याच्या कारणास्तव कंबर दुखीच्या समस्येमुळे बहुतांश महिला त्रस्त असतात. महिलांमध्ये ही समस्या पीरियड्स किंवा प्रेग्नेंसी दरम्यान फार अधिक होते. या व्यतिरिक्त कंबर दुखीच्या मागे काही कारणं ही असू शकतात. कंबर दुखीच्या समस्येपासून सुटका व्हावी म्हणून विविध प्रकारचे औषधं-गोळ्या खाल्ल्यानंतर ही समस्या दूर होत नाही.

असे नव्हे की, कमी वयातील महिलांना कंबर दुखीची समस्या होत नाही. तरुणींमध्ये कंबर दुखीच्या कारणास्तव स्नायू आखडणे, हर्नियेटेड किंवा डिजेनरेटेड डिस्क किंवा साइटिका सारख्या समस्या उद्भवू शकता.

- Advertisement -

प्रेग्नेंसी
यावेळी महिलांना खुप कंबर दुखीची समस्या जाणावते. प्रेग्नेंसीदरम्यान कंबरेच्या खाली आणि टेबलबोनजवळ खुप दुखते. तर पाचव्या महिन्यानंतर अधिक कंबर दुखू लागते. याच कारणास्तव महिलांना काही समस्यांचा सामना करावा लागतो.

- Advertisement -

ऑस्टिओपोरोसिस
वयाच्या चाळीशीनंतर महिलांमध्ये एस्ट्रोजनच्या कमतरतेमुळे प्री-मेनोपॉजचा सामना करतात. याच कारणास्तव त्यांच्या हाडांवर प्रभाव पडतो. वाढत्या वयासह पाठ दुखण्याची काही कारणं असू शकतात. जसे की, स्पॉडिंलाइटिस, स्पाइनल स्टेनोसिस आणि डिजेनेरेटिव डिस्क, जेव्हा महिला वयाच्या चाळीत पोहचतात तेव्हा त्यांना प्री मेनोपोजल अवस्थेचा सामना करावा लागतो. त्यांचा एस्ट्रोजनचा स्तर ही खुप कमी होतो.

लठ्ठपणा
लठ्ठपणा सुद्धा कंबर दुखीचे एक कारण आहे. महिलांनी हेल्दी लाइफस्टाइल फॉलो केली पाहिजे. त्यांना उठता-बसता आपला मणका सरळ कसा राहिल याकडे लक्ष दिले पाहिजे. त्याचसोबत दररोज व्यायाम केला पाहिजे. जर तुम्ही कोणत्याही प्रकारचे व्हिटॅमिन डी किंवा कॅल्शिअमचे सेवन करत असाल तर डॉक्टरांशी संपर्क करा.

सुस्त लाइफस्टाइल
सुस्त लाइफस्टाइल सुद्धा कंबर दुखीचे एक कारण आहे. असे या कारणास्तव होते की, त्या वयाच्या चाळीशीत आल्यानंतर व्यायाम करणे सोडून देतात. याच कारणास्व त्यांच्या लाइफस्टाइलवर ही परिणाम होतो. अशातच वजन ही वाढते. पोटाच्या समस्या, हार्मोनल बदल, तणावाची समस्या, झोप कमी होणे, विटामिन डी ची कमतरता असे ही बदलाव होऊ लागतात. यामुळे ही कंबर दुखते.

मेनोपॉज
वाढत्या वयासह शरिरात काही बदल होत राहतात. अशाप्रकारे एका महिलेला प्रत्येक 10 वर्षात शारिरीक बदलावांचा सामना करावा लागतो. त्यामुळेच त्या बाळाला सुद्धा जन्म देऊ शकतात. पण जेव्हा महिलेला मेनोपॉजची समस्या सुरु होते तेव्हा तिला कंबर दुखीच्या समस्येचा सामना करावाच लागतो.


हेही वाचा- पीरियड क्रॅम्प्स पासून आराम देतील ‘या’ Wall Yoga Pose

- Advertisment -

Manini