हिवाळ्यातील गुलाबी थंडी सर्वाना हवीहवीशी वाटते. पण, ही थंडी आरोग्यासाठी त्रासदायक असते. या थंडीमुळे सर्दी-खोकला तर सुरू होतोच शिवाय अंगदुखी सतावते. त्यातही थंडीत होणारी पाठदुखी नको वाटते. तुम्हालाही थंडीच्या दिवसात पाठदुखीने नको केले असेल तर आज आम्ही तुम्हाला यावरील काही सोपे उपाय सांगणार आहोत. या उपायांमुळे पाठदुखीचा त्रास काही प्रमाणात का होईना कमी होईल.
पुढील उपाय करा –
- थंड वातावरणात स्नायु कडक होतात. त्यामुळे थंड वातावरणात नियमित व्यायाम करायला हवा. व्यायामामध्ये तुम्ही स्ट्रेचिंग करू शकता. स्ट्रेचिंग केल्याने स्नायु लवचिक होतात, ज्यामुळे पाठदुखी आणि तणाव कमी होतो.
- कॅल्शिअम आणि व्हिटॅमिन डी हाडांच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे असते. याच्या कमतरतेमुळे थंडीत पाठदुखी सुरू होते. त्यामुळे थंडीच्या दिवसात शरीरात कॅल्शिअम आणि व्हिटॅमिन डी चा पुरवठा होईल असे पदार्थ खा. यासाठी तुम्ही हिरव्या पालेभाज्या खायला हव्यात आणि सुर्यप्रकाशही घेऊ शकता.
- काहींना स्मोकिंगची सवय असते. स्मोकिंगमुळे शरीरात निकोटीन प्रवेश करते. ज्यामुळे स्पायनल डिस्कमधील रक्तप्रवाह विस्कळीत होतो, परिणामी, पाठीच्या कण्यामध्ये ऑक्सिजन आणि पोषक तत्वांची कमतरता निर्माण होते आणि तुम्हाला पाठदुखीचा त्रास सुरू होतो. त्यामुळे सिगरेटची सवय सोडून द्यायला हवी.
- तुम्ही सेतुबंधासनाचा सराव करायला हवा. या आसमामुळे पाठ आणि कंबरेचा व्यायाम होतो. ज्यामुळे पाठदुखीचा त्रास कमी होतो. हे आसन करण्यासाठी सगळ्यात आधी पाठीवर झोपा आणि त्यानंतर पाय गुडघ्यात वाकवा. दोन्ही हातांनी पायांचे घोटे पकडण्याचा प्रयत्न करा. आसन करताना डोके आणि मान जमिनीवर टेकलेली असेल याची खात्री करून घ्या आणि शरीर वर उचला. या स्थितीत कमीत कमी 30 सेंकद राहण्याचा प्रयन्त करा.
- Advertisement -
- Advertisement -
हेही पाहा –
Edited By – Chaitali Shinde