तोंडाला येणाऱ्या दुर्गंधीमुळे आपला आत्मविश्वास कमी तर होतोच पण काहीवेळा लोकांसमोर आपल्याला या दुर्गंधीमुळे लाजिरवाणेही वाटू शकते. या दुर्गंधीमागे अनेक कारणे असू शकतात. जसे की दातांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणे, त्यांच नीट स्वच्छता न राखणे , हिरड्या सुजणे , रक्तस्राव होणे, कोरड्या तोंडाची समस्या अशी अनेक कारणे यामागे असू शकतात. काही वेळेस ही समस्या दातांच्या अनारोग्यामुळे निर्माण होत असली तरीही नाक, घशाच्या विकारांमुळेही ती बळावू शकते. कान, नाक घशाचे विकार, डायबिटीस, उच्च रक्तदाबाच्या तक्रारीमुळेही दुर्गंधी येऊ शकते. कांदा, लसूण, मसालेयुक्त पदार्थ सातत्याने व अति प्रमाणात खाणे, दात स्वच्छ न ठेवणे, अन्नाचे कण दात तसेच हिरड्यांमध्ये साचून राहणे ही सगळी मुखदुर्गंधीची कारणे आहेत. दातांमध्ये भरलेले सिमेंट अर्धवट निघाले असेल किंवा साफ नसेल तर त्यात अन्नकण साचून ते कुजल्यानेही दुर्गंधी येते. तुम्हीही या समस्येने त्रस्त असाल तर काही घरगुती उपायांच्या मदतीने तुम्ही ही समस्या नक्कीच दूर करू शकता.
या उपायांनी श्वासाची दुर्गंधी होईल दूर
लवंग

ब्रश केल्यानंतरही तोंडाला दुर्गंधी येत असेल तर त्यापासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही लवंगाची मदत घेऊ शकता. लवंगाच्या या उपायाकरता तुम्हाला दररोज 2 ते 3 लवंगाच्या कळ्या चावाव्या लागतील. लवंगात असणारे गुणधर्म तोंडात लपलेले बॅक्टेरिया नैसर्गिक पद्धतीने काढून टाकण्यास मदत करतात.
मीठ आणि तेल

मोहरीच्या तेलात चिमूटभर मीठ मिसळून त्याचा हिरड्यांना तुम्ही मसाज करू शकता. या उपायाने हिरड्या तर मजबूत होतीलच शिवाय तुम्हाला मुखदुर्गंधीपासूनही सुटका मिळू शकेल.
बडीशेप

जेवल्यानंतर अनेकांना बडीशेप आणि खडीसाखर खायला आवडते. बडीशेप पचनक्रिया सुधारण्यास मदत करते तर माऊथ फ्रेशनर म्हणूनही काम करते. बडीशेपमध्ये असणारे कूलिंग एजंट पोटाला थंडावा देण्यासाठी आणि मुखदुर्गंधी दूर करण्यासाठी फायदेशीर ठरतात.
तुळस- पुदिन्याची पाने

तुळस आणि पुदिन्याच्या पानांचा उपायही श्वासाची दुर्गंधी दूर करण्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. हा उपाय करण्याकरता पुदिन्याची पाने बारीक करून पाण्यात विरघळवा. या पाण्याने दिवसातून तीन वेळा गुळण्या करा.
आले

एक ग्लास पाण्यात आल्याचा रस मिसळून दिवसातून तीन वेळा कुस्करल्याने श्वासाच्या दुर्गंधीपासून सुटका मिळू शकते.
हेही वाचा : Morning Breakfast : नाश्त्यात रोज ब्रेड खाताय?
Edited By – Tanvi Gundaye