घरात बाल्कनी असल्यावर घराला शोभा येते. त्यामुळे हल्ली कित्येकजण घर खरेदी करताना छोटी का होईना घराला बाल्कनी आहे की नाही हे आवर्जुन बघतात. घरातल्या घरात बाहेरील फ्रेश हवा घेण्यासाठी, विरंगुळा म्हणून बाल्कनी हवीहवीशी वाटते. या बाल्कनीत विविध प्रकारची झाडे लावली जातात. बाल्कनी हिरवीगार दिसावी यासाठी पुरेपूर काळजी घेण्यात येते. पण, काही वेळा वर्षानुवर्ष बाल्कनीत तिच झाडे ठेवली जातात. ज्यामुळे बाल्कनीत काही नाविण्य येत नाही. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला बाल्कनी सजवण्यासाठी विविध झाडांसह आणखी काय करता येईल याच्या भन्नाट आयडीया देणार आहोत. या आयडीया वापरल्याने बालक्नीचा मेकओव्हर नक्कीच होईल आणि तुम्हाला फ्रेश वाटेल.
- बाल्कनीला सुंदर लूक देण्यासाठी वॉल प्लांटरची मदत घेऊ शकता. ऑनलाइन आणि ऑफलाइन या दोन्ही पद्धतीने विविध प्रकारचे वॉल प्लांटर तुम्हाला मिळतील.
- बाल्कनीमध्ये बर्डहाऊस ठेवता येईल. तुम्हाला आवडीचे पक्षी त्यात ठेवता येतील. बाल्कनीत बर्ड हाऊस असल्याने घरात घाण होणार नाही.
- हल्ली कित्येकजण घरात हॅंगिग प्लांट लावतात. हॅंगिंग प्लांट दिसायला खूप सुंदर असतात. लहान बाल्कनीचा मेकओव्हर करण्यासाठी हा उपाय उत्तम राहील.
- बाल्कनीत जागा असेल तर साखळीचे झोके किंवा छोटा झोका लावता येईल.
- साध्या कुंड्या ठेवण्याऐवजी बाजारात मिळणाऱ्या विविध आकाराच्या कुंड्या तुम्ही आणू शकता. हवे असल्यास आवडीच्या रंगामध्ये या कुंड्या रंगवता येते.
- बाल्कनी चहा पिण्यासाठी घरातील सर्वात योग्य जागा असते. त्यामुळे तुम्ही येथे लहानशी चेअर ठेवू शकता. विविध रंगानी सजविता येईल. चेअर नको असेल तर लाकडी बाकडा सुद्धा उत्तम राहील.
- बाल्कनीतील जमिनीवर रंगीबेरंगी रंगाचे कार्पेट लावता येईल.
- बाल्कीनीत तुम्ही हलक्या पांढऱ्या किंवा पिवळ्या रंगाच्या दिव्यांची रोषणाई करता येईल.
या पद्धतीने बाल्कनी सजवल्याने संध्याकाळच्या वेळेत येथे वेळ घालवल्यावर दिवसभराचा थकवा नक्कीच दूर होऊ शकतो.
हेही पाहा –