बहुतांश लोक आपल्या लहान मुलांना केळ खायला देतात. सहा महिन्यानंतर लहान मुलांना केळ खायला देण्यास सुरु करतात. हे त्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. मात्र केळ खायला देत असाल तर काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. अशातच आज आपण याचे काही फायदे पाहणार आहोत.
जर तुम्ही लहान मुलांना खोकला किंवा सर्दीची समस्या असेल तर त्याला केळं अजिबात खायला देऊ नका. रिपोर्ट्सनुसार, असे केल्यास खोकला अधिक वाढू शकते. त्यामुळे बाळाला समस्या होऊ शकते.
जेव्हा मुलं सर्व पदार्थ खायला सुरुवात करेल तेव्हा त्याच्या डाएटमध्ये केळ्याचा समावेश तुम्ही करू शकता.
आपल्या मुलाला अधिक केळं खायला देऊ नका. जेणेकरुन त्याला भूक लागत नाही. त्याचसोबत तो दूध किंवा अन्य पदार्थ सुद्धा खाणार नाही.
पहिल्यांदाच बाळाला केळ खायला देत असाल तर त्याला ते मॅश करुन द्या किंवा पेस्ट तयार करून खायला द्या. जेणेकरुन त्यांना खाणे सोप्पे होईल.
आपल्या मुलाला रात्री कधीच केळं खायला देऊ नका, असे केल्याने ब्लोटिंग आणि गॅस सारखी समस्या होऊ शकते. त्याचसोबत मुलाला पूर्णपणे पिकलेले केळं खायला द्या. जेणेकरुन ते त्याला पचनास सोप्पे होते.
हेही वाचा-रात्रीच्या वेळी फळ खावीत का?…वाचा