घरलाईफस्टाईलकेळीच्या सालीचे उपयोग

केळीच्या सालीचे उपयोग

Subscribe

केळे खाऊन झाल्यावर आपण त्याची साल कचर्‍यात फेकून देतो, पण केळीच्या सालीतील गुणधर्मांमुळे त्याचा विविध कामांसाठी उपयोग होऊ शकतो. ते आपण जाणून घेऊयात.

*चेहर्‍यावरील मुरुमांसाठी – चेहर्‍यावरील मुरुमे, फोड दूर करण्यासाठी इतर क्रीम्सचा वापर करण्यापेक्षा काही दिवस चेहर्‍यावर केळीची साल चोळावी. मुरुमे, फोड दूर होऊन चेहरा स्वच्छ होईल.

- Advertisement -

*चमकदार दातांसाठी – केळीची साल दातांवर घासल्यास दातांचा पिवळसरपणा जाऊन दात चमकतात.

*शरीरावरील व्रण नाहीसे होतात – हातापायावर छोटीशी जखम झाल्यास त्यावर केळीची साल बांधावी. जखम लवकर बरी होते, तसेच जखमेचे व्रणसुद्धा राहत नाहीत.

- Advertisement -

*खत तयार करण्यासाठी – केळीच्या सालीचा वरील कोणताच उपयोग करणार नसाल तर खतांमध्ये त्याचा वापर नक्की करा.

*झाडांची पाने साफ ठेवा – तुमच्या घरातील झाडांवर डाग किंवा धूळ जमा झाली असल्यास केळीच्या सालीने झाडांची पाने स्वच्छ करा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -