Thursday, March 20, 2025
27 C
Mumbai
Homeएज्युकेशनBank Of Baroda Jobs : बँकेत नोकरीची सुवर्णसंधी, येथे भरा अर्ज

Bank Of Baroda Jobs : बँकेत नोकरीची सुवर्णसंधी, येथे भरा अर्ज

Subscribe

बँकेत नोकरी करावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. सध्या (Bank Of Baroda) बॅंक ऑफ बडोदामध्ये नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध आहे. या बँकेत विविध प्रोफेशनल पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे सरकारी बँकेत चांगल्या पदावर नोकरी करण्याची ही उत्तम संधी आहे. बँक ऑफ बडोदामध्ये एकूण किती पदांसाठी भरती सुरू आहे? अर्ज कसा भरायचा आहे? अर्ज भरण्याची अंतिम तारीख काय आहे? हे जाणून घेऊयात सविस्तरपणे (Bank of Baroda Recruitment)

अधिकृत वेबसाइट –

बॅंक ऑफ बडोदामध्ये (Bank Of Baroda) मॅनेजर आणि ऑफीसरच्या विविध पदांसाठी जागा जाहीर करण्यात आल्या आहेत. या भरतीची अधिकृत सूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. अर्ज प्रक्रिया 19 फेब्रुवारी 2025 पासून सुरू झाली आहे. अर्ज करण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी बॅंक ऑफ बडोदाच्या अधिकृत वेबसाइट www.bankofbaroda.in वर शेवटची तारीख 11 मार्च 2025 पर्यत फॉर्म भरू शकतात. या तारखेपर्यत अर्ज शुल्क देखील स्वीकारले जाणार आहेत.

या पदांसाठी भरती सुरू (Bank of Baroda Vacancy)

बॅंक ऑफ बडोदामध्ये सिनियर मॅनेजर, मॅनेजर, ऑफिसर पदांसाठी भरती सुरू आहे. इन्फोर्मेशन टेक्नॉलॉजी, ट्रेड अँड फॉरेक्स, रिस्क मॅनेजमेंट आणि सिक्युरिटी डिपार्टमेंटमध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे.

पदांसाठी पात्रता (Bank Professionals Eligibility)

बॅंक ऑफ बडोदाच्या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून बी.ई बीटेक/ एमटेक/ एमई/ कॉम्प्युटर सायन्समध्ये एमसीए/ इन्फोर्मेशन टेक्नॉलॉजी /आयटी /डेटा सायन्स /ग्रॅज्युएशन /सीए/ पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री असावी अशी अट आहे. या डिग्रीसह कामाचा अनुभव असावा असे सांगण्यात आले आहे.

निवड प्रक्रिया –

उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, सायकोमॅट्रिक परीक्षण, ग्रुप डिस्कशन, मुलाखत आदी टप्प्यातून होणार आहे. या नोकरीसाठी सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना 600 रूपये शुल्क द्यावे लागणार आहेत तर राखीव प्रवर्गसाठी 100 रूपये शुल्क द्यावे लागणार आहेत.

 

 

 

 

हेही पाहा  –