आपण सगळेजण नेहमी जेवताना एवढा विचार करत नाही कि कसे बसावे काय करावे आणि काय करू नये याचा. पण जेवताना काही महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या आपण लक्षात ठेवायलाच पाहिजे. तसेच जेवताना एक प्रकारची शिस्त आपल्या अंगी लागायला हवी. ज्यामुळे जेवणाचा अनादर होत नाही तसेच शरीराला एक चांगली सवय लागते.
- Advertisement -
‘या’ टिप्स करा फॉलो…
- सर्वप्रथम, आपल्याला उठण्याची आणि बसण्याची योग्य पद्धत माहित असणे आवश्यक आहे.
- खुर्चीवर कधीही आरामात बसा. खूप आवाज करत खुर्ची हलवू नका.
- पाय पसरून बसू नका, बसताना पाय हलवत राहू नका. मोठ्याने बोलू नका.
- जेवण येताच खायला सुरुवात करू नका. थोडा वेळ थांबा. स्वतःला आणि इतरांना सेट होऊ द्या आणि सर्व पदार्थ येऊ द्या.
- जेवताना जास्त बोलू नका. सावकाश खा आणि जेवताना आवाज करू नका.
- खूप गरम अन्न खाऊ नका आणि तोंडातून फुंकून थंड करू नका. थोडा वेळ थांबा.
- प्लेट्स आणि चमचे एकमेकांवर आदळू नका.
- जेवताना मोबाईल वापरणे टाळा. फोन वारंवार तपासू नका. बाजूला ठेवा.
- टेबलावर एखादी डिश तुमच्यापासून दूर ठेवली असल्यास, टेबलावर वाकून ती स्वतः घेण्याऐवजी, समोरच्या व्यक्तीला डिश तुमच्याकडे देण्यास सांगा.
- जेवताना रुमाल मांडीवर ठेवा.
- रुमाल लहान असेल तर तो पूर्णपणे उघडून मांडीवर ठेवा आणि मोठा असल्यास अर्धा दुमडून ठेवा.
- Advertisement -
हेही वाचा : बाळाच्या स्वागतासाठी असं सजवा घर