Thursday, February 22, 2024
घरमानिनीजेवल्यानंतर आंघोळ करणे योग्य की अयोग्य?

जेवल्यानंतर आंघोळ करणे योग्य की अयोग्य?

Subscribe

निरोगी दिनचर्या आपले शरीर मजबूत करते. यामुळे सुदृढ राहण्यासाठी जसं अन्न वेळेवर खाणं गरजेचं आहे, तसचं वेळेवर आंघोळ करणही महत्वाचे आहे. यामुळे दिवसाची सुरुवातच आंघोळीने केली जाते. पण हल्लीच्या लाईफस्टाईलमुळे खाण्यापिण्यापासून ते झोपण्यापर्यंत सगळ्याच वेळा बदलू लागल्या आहेत. रात्री उशीरापर्य़ंत जागरणं, जेवणं, सकाळी उशीर उठणे अशी दिनचर्या बदलत आहे. त्याचे कोणते परिणाम शरीरावर होतात ते जाणून घेणं गरजेचे आहे.

तज्त्रांच्या मते, निरोगी जीवनशैलीसाठी नाश्त्यापासून रात्रीचे जेवण जसे ठराविक वेळीच होणे आवश्यक असते तशीच आंघोळीचीही ठराविक वेळ असणे गरजचे आहे. यामुळे सकाळी उठल्यावर आंघोळ केल्याने फ्रेश तर वाटतेच शिवाय दिवसभर काम करण्याचा उत्साहही निर्माण होतो. सकारात्मक उर्जाही जाणवते.

- Advertisement -

The REAL reason why you should never take a bath after eating | The Times of India

पण जर तुम्ही नाश्ता किंवा जेवण केल्यानंतर आंघोळ करत असाल तर तुम्हाला त्रास होण्याची शक्यता वाढते.
कारण ते शरीरासाठी धोकादायक ठरू शकते. अन्न खाल्ल्यानंतर लगेच आंघोळ केल्याने पचनक्रिया मंदावते.

- Advertisement -

जेव्हा तुम्ही अन्न खाता तेव्हा पोटाभोवती रक्ताभिसरण वाढून पचनास मदत होते. त्याच वेळी, जेवणानंतर आंघोळ केल्याने रक्ताभिसरण मंदावते. त्यामुळे पचनक्रियाही मंदावते. जेव्हा आपण अन्न खातो तेव्हा शरीरात अग्नि तत्व सक्रिय होते. अन्न जलद पचण्यासाठी शरीरातील रक्ताभिसरण वाढवते.

 


हेही वाचा :

चमकदार त्वचेसाठी करा ‘या’ ज्यूसचे सेवन

- Advertisment -

Manini