Eco friendly bappa Competition
घर लाईफस्टाईल बाथरुमच्या टाइल्स अशा करा स्वच्छ...

बाथरुमच्या टाइल्स अशा करा स्वच्छ…

Subscribe

बाथरुमच्या टाइल्स स्वच्छ करणे अत्यंत मुश्किल असते. त्या व्यवस्थितीत स्वच्छ न केल्यास तर त्या बुळबुळीत होतात. अशातच त्या वेळोवेळी स्वच्छ करणे फार महत्त्वाचे असते. त्यामुळे बाथरुमच्या टाइल्स स्वच्छ करण्यासाठी कोणत्या ट्रिक्स वापराल याच बद्दल आपण पाहणार आहोत.

विनेगरचा वापर
पाणी आणि व्हाइट विनेगर समान प्रमाणात मिक्स करुन एक मिश्रण तयार करा. हे मिश्रण स्क्रबरच्या मदतीने तुम्ही टाइल्स स्वच्छ करु शकता.

- Advertisement -

लिंबूचा रस
लिंबूच्या रसात अॅसिडिक असते. यामुळे बाथरुम स्वच्छ करण्यासाठी तुम्ही लिंबूचा रस वापरु शकते. लिंबूचा रस टाइल्सवर घासल्यानंतर त्या स्वच्छ पुसून घ्या.

बेकिंग सोडा
दीड कप सोडा, एक चमचा लिक्विड डिश सोप आणि हाइड्रोजन पॅराक्साइड मिक्स करा. हे मिश्रण बाथरुमच्या टाइल्सवर स्प्रे करा आणि स्वच्छ करा.

- Advertisement -

ब्लीच लावा
बाथरुम मधील अस्वच्छ टाइल्स स्वच्छ करण्यासाठी तुम्ही पाणी आणि ब्लीच मिक्स करा. हे मिश्रण स्प्रे बॉटलमध्ये भरा आणि त्याने टाइल्स स्वच्छ करा.

मीठ
अस्वच्छ टाइल्स स्वच्छ करण्यासाठी मीठाचा वापर करू शकता. काही वेळानंतर स्क्रबर आणि लिक्विड सोपचा वापक करून स्वच्छ करू शकता.

हाइड्रोजन पॅराऑक्साइड
टाइल्सला स्वच्छ करण्यासाठी सर्वात प्रथम हाइड्रोजन पॅराऑक्साइड आणि पीठ एकत्रित मिक्स करा. या स्क्रबरच्या मदतीने स्वच्छ करा.

बेकिंग सोडा आणि डिटर्जेंट
डिटर्जेंट पावडर आणि बेकिंग सोडा मिक्स करुन पेस्ट तयार करा. ही पेस्ट टाइल्सवर १५ मिनिटांसाठी ठेवा. याच्या मदतीने तुम्ही स्वच्छ करू शकता.


हेही वाचा- कढईचा तेलकटपणा जात नाहीये,मग फॉलो करा या टीप्स

- Advertisment -