Monday, March 17, 2025
HomeमानिनीHealthBay Leaf : वेट लॉससाठी तमालपत्र उत्तम

Bay Leaf : वेट लॉससाठी तमालपत्र उत्तम

Subscribe

भारतीय मसाले पदार्थांची चव वाढवण्यासोबत आरोग्यासाठी फायदेशीर असतात. या मसाल्यांचा वापर आरोग्यासाठी योग्य पद्धतीने केल्यास आरोग्याच्या विविध तक्रारी कमी होतात. या मसाल्यापैंकी एक असणारे तमालपत्र आरोग्यासाठी बहुगुणी आहे. तमालपत्रामध्ये व्हिटॅमिन सी, ए, बी, ई, लोह आणि कॅल्शियम मुबलक प्रमाणात आढळतात. वाढत्या वजनावर तमालपत्राचे पाणी रामबाण उपाय मानला जातो. हल्ली बहुतेकजण वाढत्या वजनाच्या समस्येने हैराण झाले आहेत. अशा व्यक्तींसाठी तमालपत्राचे पाणी पिणे लाभदायी ठरते. चला तर मग जाणून घेऊयात, वेट लॉससाठी तमालपत्राचे पाणी कसे प्यावे आणि त्याचे इतर फायदे काय आहेत,

तमालपत्र पाणी कसे तयार कराल –

  • तमालपत्र पाण्यात उकळून प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते.
  • ताजी तमालपत्र स्वच्छ धुवून घ्यावीत.
  • यानंतर एक ग्लास पाणी घ्यावे आणि त्याला उकळी आणा.
  • पाण्याला उकळी आल्यावर त्यात तमालपत्रे टाकावीत.
  • 5 ते 10 मिनिटे तमालपत्र पाण्यात उकळवावीत.
  • गॅस बंद करावा आणि पाणी थंड करून द्यावे.
  • तयार पाणी गाळून घ्यावे आणि त्या थोडा लिंबाचा रस घालून प्यावे.

तमालपत्राचे इतर फायदे –

  • पोटाशी संबंधित समस्या जसे की, बद्धकोष्ठता अपचनावर तमालपत्राचे पाणी पिणे फायदेशीर आहे.
  • शरीराचा थकवा दूर करण्यासाठी तमालपत्राचे पाणी प्यावे.
  • शरीराची पचनक्रिया सुकळीत होण्यासाठी सकाळी तमालपत्राचे पाणी प्यावे.
  • तमालपत्रातील ऍटी-ऑक्सिडंट घटक शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी फायदेशीर असतात.
  • तमालपत्रामध्ये ऍटीफंगल गुणधर्म आढळतात. ऍटीफंगल गुणधर्मामुळे शरीराचे विविध इन्फेक्शनपासून संरक्षण होते.
  • ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी तमालपत्राचा चहा प्यावा. हा चहा प्यायल्याने ब्लड प्रेशर नक्कीच नियंत्रणात ठेवता येईल.
  • डायबिटीसच्या रुग्णांसाठी तमालपत्राचा चहा वरदान समजला जातो.

 

 

 

 

हेही पाहा –

Manini