Saturday, February 8, 2025
HomeमानिनीCyber Crime Safety : सायबर गुन्ह्यांपासून असे सावध राहा

Cyber Crime Safety : सायबर गुन्ह्यांपासून असे सावध राहा

Subscribe

आजच्या डिजिटल युगामुळे सायबर गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत चाली आहे. ऑनलाईन फसवणूक, हॅकिंग, फिशिंग डेटा चोरी करणे इत्यादींचे प्रमाण तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे वाढत चाले आहे. हे गुन्हे घडण्यामागचं कारण म्हणजे आपण सतर्क नसतो. त्यामुळे सावध राहणे अत्यंत गरजेचं आहे. आज आपण जाणून घेऊयात सायबर गुन्ह्यांपासून कसं सावधान राहायचं.

वैयक्तिक माहिती

आपली वैयक्तिक माहिती इतरांन सोबत शेअर करू नका. बऱ्याचदा आपण माहिती शेअर करतो त्यामुळे सायबर गुन्हेगारी अजून वाढते. तुमचा फोन नंबर, पत्ता, आर्थिक माहिती सार्वजनिकरित्या शेअर करू नका.

स्ट्रॉंग पासवर्ड ठेवा

एक स्ट्रॉंग पासवर्ड ठेवा, जेणेकरून तुमचा पासवर्ड हॅक होणार नाही. आपला पासवर्ड कोणालाही सांगू नका. एकाच पासवर्डचा पुन्हा वापर टाळा.पासवर्ड नेहमी संख्यांश, विशेष चिन्हे आणि मोठ्या-लहान अक्षरांचा वापर करा.

संशयास्पद लिंक आणि ईमेलपासून सावध राहा

जर तुम्हाला कोणती संशयास्पद लिंक किंवा ईमेल आले असतील तर त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करा. अनोळखी व्यक्तीकडून आलेल्या ईमेल किंवा मेसेजमधील लिंक आणि अटॅचमेंट्स उघडू नका.

पब्लिक Wi-Fi वापरताना खबरदारी घ्या

पब्लिक Wi-Fi वापरताना खबरदारी घ्या. फ्री Wi-Fi वापरताना महत्त्वाच्या वेबसाइट्स (बँकिंग, ईमेल) लॉगिन करू नका.शक्यतो VPN (Virtual Private Network) चा वापर करा.

ऑनलाईन फसवणुकीपासून सावध राहा

बऱ्याचदा काही आकर्षक ऑफर्स पाठवल्या जातात त्याकडे दुर्लक्ष करा. ऑनलाईन खरेदी करताना विशेष काळजी घ्या. फक्त विश्वासार्ह आणि सुरक्षित वेबसाइट्सचा वापर करा.

आर्थिक व्यवहार सुरक्षित पद्धतीने करा

सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आर्थिक व्यवहार सांभाळून करा. ऑनलाईन पेमेंट करताना विशेष दक्षता घ्या.

सायबर गुन्ह्याची तक्रार करा

जर तुमच्या सोबत सायबर गुन्हा झाला असेल तर त्वरित जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा सायबर गुन्हेच्या वेबसाइट वर जाऊन तक्रार करा.

हेही वाचा : Parenting Tips : मुलांना आळशी बनवू शकतात आईवडिलांच्या या सवयी


Edited By : Prachi Manjrekar

Manini