आजच्या डिजिटल युगात ऑनलाइन डेटिंगला जास्त प्राधान्य दिले जाते. या प्लॅटफॉर्ममुळे दोघांना एकमेकांना समजून घेण्याची, ओळखण्याची संधी मिळते. सध्याच्या काळात ऑनलाइन डेटिंग खूप लोकप्रिय झाली आहे. परंतु ऑनलाइन डेट करताना आपल्याला बऱ्याच गोष्टींची काळजी घ्यावी लागते. काळजी घेतली नाही तर भविष्यात अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. आज आपण जाणून घेऊयात ऑनलाइन डेट करताना कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे.
प्रोफाइल नीट तपासा
संवाद साधण्यापूर्वी प्रोफाइल नीट तपासून घ्या. माहिती व्यवस्थित वाचा. जर माहिती अपूर्ण, अतिशय परिपूर्ण किंवा अविश्वसनीय वाटत असेल, तर संवाद वाढवू नका.
वैयक्तिक माहिती
जर तुम्ही नुकतंच संवाद सुरु केला असेल तर वैयक्तिक माहिती शेअर करू नका. आधी एकमेकांना नीट ओळखून घ्या. फोन नंबर, घराचा पत्ता, कामाचे ठिकाण यांसारखी माहिती देऊ नका.
व्हिडिओ कॉलवर भेटा
प्रत्यक्ष भेटीपूर्वी किमान एकदा व्हिडिओ कॉल करा, त्यामुळे व्यक्ती खरी आहे का हे तपासणे सोपे जाते आणि तुमची फसवणूक होणार नाही.
सार्वजनिक जागा निवडा
पहिल्या भेटीसाठी सार्वजनिक जागा निवडा. सार्वजनिक जागा निवडण्यामागचं कारण म्हणजे तुम्ही सुरक्षित राहाल आणि तुमच्या सोबत काही चुकीचं घडणार नाही.
फसवणुकीपासून सावध राहा
बऱ्याचदा ऑनलाइन डेटिंग करताना बऱ्याच लोकांची फसवणूक हॊते . त्यामुळे तुम्ही जागरूक राहा जर कोणी पैसे मागत असेल, भावनिक ब्लॅकमेल करत असेल किंवा वेगाने विश्वास जिंकण्याचा प्रयत्न करत असेल, तर अशा व्यक्तीपासून दूर राहा.
सुरक्षिततेला प्राधान्य द्या
कोणत्याही प्रकारे अस्वस्थ वाटत असल्यास त्या व्यक्तीसोबत संपर्क तोडण्यास अजिबात संकोच करू नका.
ऑनलाइन डेटिंग आनंददायक आणि यशस्वी होण्यासाठी योग्य सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. विश्वासू आणि जबाबदार पद्धतीने याकडे पाहिल्यास चांगल्या नात्याची सुरुवात होऊ शकते.
हेही वाचा : Relationship Tips : जोडीदार शोधताना या चुका टाळा
Edited By : Prachi Manjrekar