अनेकजण जेवणामध्ये दालचिनीचा वापर करतात. या दालचिनीमुळे जेवण अधिक रुचकर लागते. दालचिनीचे आरोग्यासाठीही बरेच फायदे आहेत. आयुर्वेदिक औषधी असलेली दालचिनी सर्व प्रकारच्या औषधांमध्ये वापरले जातात. दालचिनीमध्ये अॅंटी-बॅकक्टेरीअल गुण मोठ्या प्रमाणात असतात.त्यामुळे कोणत्याही आजाराच्या इंफेक्शनपासून आपण दूर राहू शकतो.
दालचिनी केवळ आरोग्यासाठीच नव्हे तर आपल्या त्वचेसाठी फायदेशीर आहे. दालचिनीतील अँटीऑक्सिडंट, अँटीसेप्टिक आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म त्वचेसाठी खूप चांगले मानले जातात. त्वचेवर दालचिनी पावडर लावल्याने त्वचेचा रंग तर सुधारतो. शिवाय काळे डाग देखील कमी होण्यास मदत होते. दालचिनी त्वचेसाठी फायदेशीर असली तरी तिचा योग्य वापर करणं देखील तितकचं महत्वाच आहे.
दालचिनी लावताना घ्या काळजी
- पॅच टेस्ट महत्वाची
जर तुम्ही पहिल्यांदा दालचिनी चेहऱ्यावर लावत असाल तर एकदा पॅच टेस्ट करा. कारण, दालचिनीमुळे त्वचेत लालसरपणा, जळजळ होऊ शकते.
- दिवसा लावू नका
दालचिनी दिवसा कधीही लावू नये. जर तुम्ही दिवसा दालचिनी लावत असाल कर उन्हामध्ये घराबाहेर पडू नका.
- चेहरा स्वच्छ करु लावा
दालचिनी त्वचेवर लावण्यापूर्वी चेहरा नेहमी स्वच्छ करा. अनेकदा आपल्या चेहऱ्यावर घाण, प्रदूषण किंवा मेकअप असतो. अशावेळी दालचिनीचा वापर केला तर त्याचा परिणाम मिळत नाही.
- दररोज वापरु नका
दालचिनी चेहऱ्यासाठी कितीही फायदेशीर असली तर याचा अधिक वापर चेहऱ्यावर करु नये. सतत दालचिनीचा वापर केल्यास चेहऱ्यावर खास होणे, जळजळ होणे असा त्रास तुम्हाला होऊ शकतो.
हेही वाचा :