मुंबई : उत्तर प्रदेशामधील अलीगढमध्ये एका व्यक्तीच्या पेंटमध्ये ठेवलेला आयफोन जळण्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ माजली. ही घटना घडत असताना ती व्यक्ती घराच्या बाहेर बसली होती. गेल्या काही दिवसांपासून Apple आयफोन कंपनीने वॉर्निंग देखील दिली होती की, लोकांनी फोन चार्ज करण्याची योग्य पद्धत शिकायला हवी. जेणे करून भविष्यात लोक मोठ्या धोक्यापासून वाचू शकतील. यासाठी Apple ने आयफोन असो किंवा अँड्रॉइड असो, यांच्या अपघातापासून वाचू शकतो. यासंदर्भात Apple कंपनीने काही सूचना दिल्या आहेत.
कंपनीने इशारा दिला की, जेणेकरून तुम्हाला किंवा फोनला आग, इलेक्ट्रिक शॉक, इजा, फोनचे नुकसान होण्यापासून संरक्षण राहिली. यासाठी Appleने आयफोनमुळे होणाऱ्या अपघातानंतर फोन चार्जिंग करताना सावधान राहण्यास सांगितले होते. पण, ही सावधगिरी फक्त Appleच्या फोनसंदर्भात नव्हती तर अँड्रॉइड वापरणाऱ्यासाठी देखील होती. मागच्या काही काळात अँड्रॉइडमध्ये देखील ब्लास्टच्या घटना घडल्या आहेत.
Apple कंपनीने ‘या’ दिल्या सूचना
- फोन बाजूला ठेवून झोपू नका
- ज्या ठिकाणी चांगले वेंटिलेशन असलेल्या ठिकाणी फोन चार्ज करा
- गोदडी किंवा उशी खाली फोन ठेवून झोपू नका
- Apple फोन हा त्यांच्याच चार्जने चार्ज करावा
- फोन चार्जिंगला असताना गेम खेळू नका आणि फोनवर बोलू नका
स्मार्टफोन ब्लास्ट कसा होतो
सर्वात जास्त मोबाइल फोन हा बॅटरीमुळे फुटतो. बॅटरी फुटण्याचे कारण म्हणजे हीट होणे. त्याचबरोबर लोकांच्या काही चुकांमुळे देखील बॅटरी फुटते. बॅटरी ओव्हरहीट होऊन फोन फुटतो. उदा. रेगुलर 8-10 तास मोबाइल चार्ज करता आणि फोन गरम ठिकाणी जास्त वेळ ठेवतात, असे मुंबई आयटी एक्सपर्ट मंगलेश एलियाने दिली आहे.
हेही वाचा – जेवताना हसू आणि बोलू नका,मोबाईल बघू नका, का ते वाचा
मोबाइल फोन फुटण्याचे ‘ही’ आहेत कारणे
- फोन गरम होणे.
- स्क्रीन अस्पष्ट दिसणे.
- फोनची स्क्रीन टन न करता सुरू होणे.
- फोनची स्क्रीन ही पूर्णपणे डार्कनेस होणे.
- फोन वारंवार हँग होणे आणि प्रोसेसिंग स्लो होणे.
- बोलत असताना फोन नेहमीपेक्षा जास्त गरम होत आहे.