घरताज्या घडामोडीपावसाळ्यात कच्च सॅलड खाताना सावध राहा!

पावसाळ्यात कच्च सॅलड खाताना सावध राहा!

Subscribe

पावसाळ्यात सॅलड खाताना काळजी घ्या.

सध्या प्रत्येकाच्या डाएट प्लॅनमध्ये सॅलड हा प्रकार असतोच. सॅलड खाणे खूप फायदेशीर असते. प्रत्येक मोसमात आपण सॅलड खात असतो. पण प्रत्येक मोसमात सॅलड खाण्याची पद्धत बदलली पाहिजे. कारण जर सॅलड खाण्याची पद्धत बदलली नाही तर शारीरिक त्रास होण्याची शक्यता अधिक असते. आपल्या देशात पावसाळ्याची सुरुवात कधी जूनमध्ये तर कधी जुलै महिन्यापासून होते. या मोसमात रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊ लागते त्यामुळे अनेक लोक कच्च सॅलड खाण्यास सुरुवात करतात. असे केल्याने शरीरास बरेच पोषक द्रव्ये मिळतात. पण या मोसमात कच्च सॅलड काहीवेळा आजरांना निमंत्रण देऊ शकते. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात कच्च सॅलड खाताना काय खबरदारी घ्यावी हे आज आपण जाणून घेणार आहोत…

  • सॅलडमध्ये ज्या हिरव्या पालेभाज्या आणि कच्चा भाज्या असतात त्या पाण्यात चांगल्या प्रकारे उकळून घ्यायच्या. यामुळे भाज्यांवर असलेले अनेक जिवाणू नष्ट होतात.असे केल्याने हंगामी रोग होऊ शकत नाही.
  • विशेष म्हणजे पावसाळ्याच्या मोसमात सॅलडमध्ये शक्यतो पालभाज्यांचा वापर करू नये. जसे कोबी, पालक याचा वापर करू नये कारण या भाज्यांवर सूक्ष्म कीटक आणि जिवाणू, विषाणू असतात. जे आपण पाहू शकत नाही. या भाज्यांमुळे पचन शक्ती देखील बिघडू शकते.
  • सॅलडमधल्या भाज्या गरम पाण्यात मीठ घालून देखील ठेवू शकता. ज्यामुळे जिवाणू आणि विषाणू नष्ट होतील. पावसाळ्यात काही जंत फळ आणि भाज्यांमध्ये अंडी देतात आणि जर आपण ते खाल्ले तर ते आपल्या पोटात देखील ते जंत वाढू शकतात.
  • पावसाळ्यात भाज्यांवर कीटकांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाण होत असल्यामुळे शेतकरी कीटकनाशकाची फवारणी करतात. यामुळे भाज्यांवर अधिक परिणाम होता. अशा परिस्थिती पावसाळ्यात कच्च सॅलड शरिराला नुकसान पोहोचवू शकते.
  • सॅलड ऐवजी कडधान्याचे पदार्थ पावसाळ्यात खावे. मोड आलेले कडधान्य खाणे शरीरास चांगले असते. यामुळे पोषक तत्त्व वाढतील.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -