घरलाईफस्टाईलहेअर स्ट्रेटनिंग करताना सावधान!

हेअर स्ट्रेटनिंग करताना सावधान!

Subscribe

सरळ आणि सुळसुळित केसांसाठी महिला विविध प्रकारच्या केमिकल ट्रिटमेंट्स करत असतात. ब्राझिलियन ब्लोआउट आणि केरेटिन ट्रीटमेंट अलिकडे खूप लोकप्रिय झाले आहे. या उपचारपध्दतीमध्ये केसांना फ्लॅट लूक देण्यासाठी कॅरेटिन लिक्विडचा वापर केला जातो. ही ट्रीटमेंट घेतल्यानंतर केस काही महिने केस सरळ रहातात.

पण या ट्रिटमेंटमध्ये फॉर्मल्डिहाइड्सची पातळी उच्च रहाते असं अलिकडेच एका संशोधनातून आढळून आलं आहे. फॉर्मल्डिहाइड्समुळे डोकेदुखी, डोळ्यांची जळजळ, गळ्याला त्रास जाणवणे आणि अगदी कॅन्सरपर्यंत धोका उद्भवू शकतो असे दिसून आले आहे.

- Advertisement -

फॉर्मल्डिहायइड्स तसे पाहता शॅम्पू आणि इतर उत्पादनांमध्येही असतं. पण त्याचे प्रमाण कमी असल्यामुळे त्याच्या पासून होणारा धोका देखील कमी असतो. ज्या मुलींचे केस कुरळे किंवा ड्राय आहेत त्यांच्यासाठी ही चांगली ट्रिटमेंट आहे. या महिलांचे केस दाट आहे त्या ते कमी भासण्यासाठी ही ट्रीटमेंट घेऊ शकतात. पण या ट्रिटमेंटचे आरोग्यावर होणारे हानिकारक परिणाम पाहता या ट्रिटमेंटचा वापर शक्यतोवर न केलेलाच बरा.

खरी वस्तुस्थिती अशी आहे की, मृतदेहावर एम्बाम करण्यासाठी म्हणजे लेप लावण्यासाठी फॉर्मल्डिहाइड्सचा वापर केला जातो. केरेटिन ट्रिटमेंटच्या वेळी अनेक फ्यूम्स सोडले जातात. यामध्ये १७ ते १८ टक्के फॉर्मल्डिहाइड्स असतात. याचा ०.२ टक्के वापर शरीरासाठी सुरक्षित मानला जात नाही. यूएसच्या काही भागांत आणि कॅनडामध्ये फॉर्मल्डिहाइड्सवर बंदी आहे. त्यामुळे तुम्ही जर हेअर स्ट्रेटनिंगची ट्रिटमेंट करत असाल तर… तुम्ही या ट्रिटमेंटसाठी कुठल्याही सलून अथवा ब्युटीपार्लरमध्ये गेलात तर प्रथम उत्पादनातील इनग्रेडियंटसची नक्की माहिती करून घ्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -