बीच वेकेशनचा आपण कधी ना कधी प्लॅन करतोच. त्यावेळी आउटफिट्स नक्की काय घालावेत हे कळत नाही. एकतर बाहेर खुप उनं आणि स्किन टॅन होण्याची भीती सुद्धा असते. त्यामुळे बीच वेकेशनचा जर तुम्ही प्लॅन करत असाल तर असे नक्की कोणते आउटफिट्स ट्राय केले पाहिजेत हे पाहूयात.
बीच आउटफिट्स निवडताना पुढील काही गोष्टी आधी लक्षात ठेवा
-जेव्हा तुम्ही बीचवेअर बद्दल विचार करता तेव्हा पहिला ऑप्शन स्विमसूटचा येतो. मात्र स्विमसूट व्यतिरिक्त ही काही आउटफिट्स असतात ते तुम्ही ट्राय करू शकता. पण त्यावेळी पुढील काही गोष्टी आधी लक्षात घ्या.
-फ्लिप-फ्लॉप किंवा सँन्डल घालणे नेहमीच बेस्ट असते. जेणेकरुन तुम्ही बीचवर वॉक करण्यासाठी लगेच ते काढून ठेवू शकता.
-स्नीकर्स किंवा जॉगर्स घालू नका. कारण ते पाण्यात भिजल्यास ओलसर होऊ शकतात.
-योग्य प्रकारचे फॅब्रिक घालणे गरजेचे आहे. तुम्ही वेलवेट फॅब्रिक ऐवजी फ्लोई किंवा कंम्फर्टेबल कपडे घाला.
-ट्राउजर किंवा जीन्स ऐवजी ड्रेस बेस्ट ऑप्शन आहे.
-उन्हापासून बचाव करण्यासाठी हॅटचा वापर करा.
-बिकनी किंवा स्विमसूट खरेदी करताना योग्य साइज आणि फिटिंगकडे लक्ष द्या.
-अधिक एक्सेसरीज घालू नका आणि विशेष रुपात असे जे पाणी लागल्यानंतर खराब होतील.
-सनस्क्रिन तुमच्यासोबत नेहमी ठेवा.
बीच आउट्सफिट्स ऑप्शन
-मल्टी कलर सॅटिन बीचवेअर शॉर्ट कफ्तान
कफ्तान सध्या ट्रेंन्डमध्ये आहे. कफ्तान ड्रेस असो किंवा फंकी कफ्तान टॉप तुम्ही याची निवड करू शकता. कंम्फर्ट आणि ग्लॅमर लूक येण्यासाठी सॅटिन कफ्तान शॉर्ट ड्रेस घालू शकता.
फ्लोरल प्रिंडेट टू-पीस मॅक्सी ड्रेस विद स्लिट
कूल आणि कॅज्युअल लूकसाठी स्लिट असणारा एखादा ट्रेंन्डी टू-पीस मॅक्सी ड्रेस निवडा. फ्लोरल प्रिंट तुम्हाला कंम्फर्टेबल आणि फॅशनेबल लूक देऊ शकतो.
क्रेप ए-लाइन ऑफ शोल्डर मॅक्सी ड्रेस
पफ्ड स्लीव्स असणारा ऑफ-शोल्डर, फ्लोई क्रेप मॅक्सी ड्रेसचा पर्याय निवडू शकता. कॅज्युअल आणि पार्ट आइटफिटदरम्यान हा सुद्धा एक असा ड्रेस आहे जो केवळ बीचवरच नव्हे तर अन्य ठिकाणी सुद्धा घालता येऊ शकतो.
जॉर्जेट फ्लोरल बीचवेअर टू-पीस कवरअप
क्रॉप टॉप आणि टाय अप बॉटमसह फ्लोरल टू-पीस स्विमवेअर कवरअप महिलांसाठी एक परफेक्ट बीच आउटफिट आहे. रिलॅक्स्ड, ट्रेंन्डी, कंम्फर्टेबल असलेले हे आउटफिट नक्की ट्राय करू शकता.
हेही वाचा- ओवरसाइज टी-शर्ट अशा प्रकारे करा स्टाइल