घरलाईफस्टाईलबीट रुट एक आरोग्यदायी कंदमुळ

बीट रुट एक आरोग्यदायी कंदमुळ

Subscribe

आरोग्यासाठी बीटचे फायदे जर आपण जाणून घ्याल, तर निसर्गाच्या या भेटवस्तूमुळे आपण अनेक सामान्य रोगांपासून मुक्त होऊ शकता. दिसण्यात असलेले, लाल-लाल बीटरूट आपल्या आरोग्यासाठी अनेक मार्गांनी एक महत्त्वाची भूमिका बजावते. तसेच बीट एक नॅचरल फुड कलरचेसुध्दा काम करते. चला तर मग जाणून घेऊयात या गुणकारी बीटचे आरोग्यदायी फायदे …

ब्लड शुगर लेव्हल कमी करते

बीट नायट्रेट्सचा एक चांगला स्रोत आहे. याचे सेवन केल्यावर हे नायट्रेट्स आणि एक गॅस नायट्रिक ऑक्साइड्समध्ये बदलते. हे दोन्ही गुण धमन्यांना रुंद करण्यात आणि ब्लड प्रेशर कमी करण्यास मदत करते. संशोधनानुसार प्रत्येक दिवशी ५०० ग्रॅम बीट खाल्ल्याने ६ तासांच्या आत ब्लड प्रेशर कमी होते.

- Advertisement -

खराब कोलेस्ट्रॉल कमी करतो

बीटमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर, फ्लोवेनॉइड्स आणि बेटासायनिन असते. बेटासायनिनमुळेच बीटाचा रंग लाल-जांभळा असतो. हे एक शक्तीवर्धक अँटीऑक्सीडेंट आहे. हे एलडीएल कोलेस्ट्रॉलचे ऑक्सीकरण कमी करण्यास मदत करते, ज्यामुळे ते धमन्यांमध्ये जमा होत नाही. यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.

गर्भवती महिलांना फायदेशीर

बीटमध्ये उच्च प्रमाणात फॉलिक अ‍ॅसिड असते. हे गर्भवती महिलेला आणि तिच्या होणार्‍या बाळासाठी महत्त्वाचे आहे. गर्भवती महिलांना यामुळे अतिरिक्त ऊर्जा मिळते.

- Advertisement -

आस्टिओपोरोसिसपासून बचाव

बीटमध्ये मिनरल सिलिका असते. या तत्त्वामुळे शरीर कॅल्शियमला प्रभावी रुपात वापरता येऊ शकते. कॅल्शियम आपल्या दात आणि हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक असते. यामुळे दिवसातून दोन वेळा बीटचे ज्यूस प्यायल्याने आस्टिओपोरोसिस आणि हाडे व दातांच्या समस्या होणार नाही.

beets-root

डायबिटीज वर नियंत्रण

ज्या लोकांना डायबिटीज आहे ते बीट खाऊन त्यांची गोड खाण्याची इच्छा पूर्ण करु शकतात. हे खाण्याचा फायदा होतो. कारण यामुळे गोड खाण्याची इच्छा पूर्ण होते आणि ब्लड शुगर लेव्हलसुध्दा वाढत नाही. कारण यामध्ये ग्लाइसेमिक इंडेक्स व्हेजिटेबल असते. यामध्ये कॅलरी जास्त असतात आणि हे फॅट फ्री असते. डायबिटीजच्या रुग्णासाठी हे चांगले औषध आहे.

अ‍ॅनीमिया

हा एक समज आहे की, बीटचा रंग लाल असल्यामुळे हे रक्त वाढवण्यास फायदेशीर असते आणि यामुळे हे अ‍ॅनीमियामध्ये जास्त खाल्ले पाहिजे. या समजामध्ये थोडी सत्यता आहे. बीटमध्ये मोठ्या प्रमाणात आयर्न असते आणि आयर्नमुळे हिमाग्लूटनिनी बनते, जे रक्ताचा असा भाग असतो की, जे ऑक्सिजन आणि अनेक पोषक तत्त्वांना शरीराच्या दुसर्‍या अंगापर्यंत पोहचवण्यास मदत करतो. बीटमधील हेच आयर्न तत्त्व अ‍ॅनीमियापासून लढण्यास मदत करतात.

थकवा दूर करते

एका संशोधनात सिध्द झाले की, बीट थकवा दूर करण्यास मदत करते. याचे नायट्रेट तत्त्व धमन्यांचा विस्तार करण्यास मदत करतात. यामुळे संपूर्ण शरीराला ऑक्सिजन योग्य प्रमाणात मिळते आणि एनर्जी वाढते. याव्यतिरिक्त बीटमधील आयर्नमुळे स्टॅमिना वाढण्यास मदत होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -