घरलाईफस्टाईलदातांचे सौंदर्य हे आरोग्याचे लक्षण

दातांचे सौंदर्य हे आरोग्याचे लक्षण

Subscribe

सुंदर दात फक्त स्मित हास्यापुरती उपयुक्त नसते तर, त्यांचा आपल्या आरोग्याशी देखील संबंध असतो

दातांचे सौंदर्य हे प्रत्येकाच्या व्यक्तिमत्त्वाची ओळख असते. दातांचे सौंदर्यासह आपले हास्य देखील आपली ओळख मानली जाते. आपल्या समोरच्य़ा व्यक्तीने स्मित हास्य दिले की ती व्यक्ती अधिकच सुंदर दिसून त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर नकळत आनंद पसरतो. पांढरे शुभ्रदात आणि आपल्या दातांचे आरोग्य आपल्या सौंदर्यात भर घालत असते.

- Advertisement -

सुंदर दात फक्त स्मित हास्यापुरती उपयुक्त नसते तर, त्यांचा आपल्या आरोग्याशी देखील संबंध असतो. सुंदर आणि निरोगी दात यामुळे तोंडाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. सौंदर्यशास्त्र आणि आरोग्यदृष्ट्याही दातांना अत्यंत महत्त्व आहे.  तोंडाचे आरोग्य उत्तम राखणे ही अत्यंत आवश्यक गोष्ट असते. याकरिता नेमके काय करावे?

यासाठी खास टिप्स

  • दात मजबूत बनवण्यासाठी मोहरीच्या तेलात मीठ घालून दातांना हळूवारपणे मालिश करा. पाण्यात तुरटी मिसळून त्या पाण्याने गुळण्या केल्याने हिरड्यांना सूज आली असेल किंवा त्यांच्यामधून रक्त येण्याचा त्रास कमी होण्यास मदत होते.
  • सफरचंदाचे साल किंवा अर्क दातांसाठी खूपच उपयुक्त ठरते. दातांवर डाग पडलेले असतील, तर सफरचंदाच्या अर्कात छोटा अर्धा चमचा बेकिंग सोडा मिसळून पेस्ट तयार करून दातांवर पडलेल्या डागांवर घासा.
  • दात पांढरे दिसण्यासाठी केळाचे साल म्हणजेच आवरण दातांवर घासा. यामुळे दात पांढरे शुभ्र होण्यास मदत होईल.
  • टूथपिकचा वापर करू नका. टूथपिकच्या वापराने हिरड्यांना दुखापती होतात आणि दोन दातांच्या फटी जास्त प्रमाणात निर्माण होतात. टूथपिकचा वापर करण्याऐवजी डेंटल प्लस किंवा इंटरडेंटल ब्रशचा वापर करा.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -