Wednesday, June 7, 2023
घर मानिनी ब्युटी आणि सेक्सचे कनेकश्न काय?

ब्युटी आणि सेक्सचे कनेकश्न काय?

Subscribe

तुम्ही सेक्स लाइफमध्ये खुप खुश असाल तर तुम्ही आनंदी राहताच पण तुमचे सौंदर्य ही अधिक उजळते. पण हे खरं आहे का?

चंदा मांडवकर :

 

आपण बहुतांश वेळेस लोकांना असे म्हणताना ऐकतो की, तुझे सौंदर्य दिवसागणिक वाढत आहे, क्या बात है? असे बोलल्यानंतर चेहऱ्यावर एक स्मितहास्य उमटते. परंतु यामागे काही कारणं असतात. त्यापैकीच एक म्हणजे तुमची सेक्स लाइफ. कारण असे म्हटले जाते की, तुम्ही सेक्स लाइफमध्ये खुप खुश असाल तर तुम्ही आनंदी राहताच पण तुमचे सौंदर्य ही अधिक उजळते. पण हे खरं आहे का? खरंच ब्युटी आणि सेक्स मध्ये काही कनेक्शन असते का? अशा काही प्रश्नांची उत्तरे येथे जाणून घेऊयात.

- Advertisement -

त्वचा आणि केसांसाठी उत्तम जर्नल ऑफ सेक्शुअल मेडिसिन मध्ये छापण्यात आलेल्या रिपोर्ट्सनुसार, ऑर्गेज्मच्या कारणास्तव शरिरात एस्ट्रोजेनचा स्तर वाढतो. ज्यामुळे आपली त्वचा आणि केस हेल्दी होतात. एस्ट्रोजेनमुळे स्किन कोमल होते आणि सुरकुत्या ही येत नाहीत. अशातच त्वचेमधील कोलाजनचा स्तर ही नियंत्रणात ठेवण्यास मदत होते आणि त्यामुळेच आपली त्वचा ही मऊ आणि कोमल होते.

चेहऱ्यावर येतो ग्लो

Couple Sunset Images - Free Download on Freepik

- Advertisement -

सेक्स केल्याने आपल्या हृदयाचे ठोके वाढतात पण त्याचसोबत रक्ताचा संचार ही वाढतो. त्यामुळे शरिरात ऑक्सिजनचे प्रमाण वाढले जाते. ऑक्सिनच्या उत्तम पुरवठ्यामुळे चेहऱ्यावर ग्लो येतो.

तारुण्य आणि उजळ त्वचा

Page 32 | Couple Hugging In Bed Images - Free Download on Freepik

३ हजार महिला आणि पुरुषांवर करण्यात आलेल्या एका अभ्यासात असे समोर आले आहे की, जी लोक आठवड्यातून तीन वेळेस सेक्शुअल अॅक्टिव्ह असतात ते आपल्या वयाच्या ७ ते १२ वर्ष अधिक तरुण दिसतात.

ऑर्गैज्म तुमचा मूड ठिक करतो

Couple Photoshoot Ideas with Cute Couple Pose Reference

 

तुम्हाला माहिती नसेल की, ऑर्गेज्ममुळे शरिरात सेराटोनिन आणि डीएचएचा स्राव होतो. सेराटोनिन एक न्युरोट्रांसमीटर आहे,जे तुम्हाला आनंदीत आणि उत्साही ठेवण्यास मदत करतो. यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती ही वाढते.

सेक्सच्या कारणास्तव तुम्ही आनंदी राहा सेक्स केल्यानंतर शरिरात फील गुड हॉर्मोन्स डोपामाइन आणि ऑक्सिटॉसिन निर्माण होतात. ऑक्सिटॉसिनमुळे तुम्ही रिलॅक्स झाल्याने तुम्हाला स्वत:ला खुप आनंदीत वाटतेच. पण दुसऱ्यांच्या प्रति ही तुम्ही आनंद करता.

आत्मविश्वास वाढतो

600+ Free Beautiful Couple & Couple Images - Pixabay

तुम्हाला ऐकून हैराण होईल की, सेक्स आणि मेडिटेशन मेंदूच्या एका हिस्स्याला प्रभावित करतात. मेडिटेशनचा जो प्रभाव आपल्या मनासह मेंदूवर जो होतो तसाच प्रभाव सेक्स केल्यानंतर होतो. तुमचा आत्मविश्वास वाढतो. तुमचे अंतरमन आनंदित होते. तुम्ही एखादी समस्या योग्य पद्धतीने सोडवण्यास सक्षम होता.


हेही वाचा :

लग्नानंतर मुलींचे वजन का वाढते?

- Advertisment -

Manini