आपल्या स्कॅल्पची काळजी घेण्याची पहिली आणि महत्त्वाची स्टेप असते ती म्हणजे केसांना आणि स्कॅल्पला तेल लावून त्याची चांगली मालिश करणे. मागील काही वर्षांपासून स्किन केअरसाठी फेशिअल ऑईल वापरण्याचा ट्रेंड सध्या वाढलाय. हे तेल केवळ कोरडेपणाच घालवत नाही. तर पोषकतत्त्वांची कमतरतादेखील भरुन काढते. तसं पहायला गेलं तर आपल्या केसांची आणि त्वचेची तसेच चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी वेगवेगळ्या तेलांचा वापर केला जातो. परंतु तुम्हाला माहित आहे का की असे अनेक तेलांचे प्रकार आहेत जे त्वचा आणि स्कॅल्प अशा दोन्हींकरता उपयुक्त ठरू शकतात.
या तेलांच्या नियमित वापरामुळे शरीरातील पोषकतत्त्वांची कमतरता भरुन निघते. तुम्ही या तेलांमध्ये इसेंशिअल ऑईल मिक्स करुन तुमच्या त्वचेला आणि स्कॅल्पला निरोगी ठेवू शकता. एकाच प्रकारचं तेल वापरल्यामुळे पैशांचीदेखील बचत होते. जाणून घेऊयात नेमकं हे तेल कोणतं आहे याविषयी.
नारळाचे तेल :
नारळाचे तेल हे खूपच फायदेशीर तेल आहे. जे केसांप्रमाणेच त्वचेचीही काळजी घेते. जर तुमची त्वचा खूपच कोरडी झाली असेल तर तुम्ही नारळाच्या तेलाला तुमच्या स्किन केअर रुटीनचा भाग बनवू शकता. यामुळे तुमची त्वचा मुलायम होऊ शकेल.जर स्किन ऑयली असेल तर त्वचेची छिद्रं ब्लॉक करण्यासाठी याचा फायदा होऊ शकतो. त्वचेप्रमाणेच शुष्क आणि कोंडा असलेल्या केसांवर नारळाचे तेल लावल्याने अनेक फायदे मिळू शकतात. हे स्कॅल्पला हायड्रेट करण्यासोबतच इचिंगदेखील कमी करते. सोबतच केसांना मजबूत करून त्यांना वाढण्यासाठी मदत करते. याला थोडं कोमट करून केसांवर लावल्यास अधिक चांगले परिणाम दिसू शकतात.
अर्गन ऑईल :
अर्गन ऑईलमध्ये व्हिटामिन ई आणि अँटिऑक्सिडंट्स असतात. जे कोरड्या, सेन्सिटिव्ह किंवा एजिंग स्किनकरता एकदम बेस्ट ऑप्शन असतो. अर्गन ऑईल तुमच्या त्वचेला खोलवर हायड्रेट करते, सुरकुत्या कमी करते. जर तुमचा स्कॅल्प कोरडा आणि डॅमेज्ड झाला असेल तर तुम्ही अर्गन ऑईलचा वापर करू शकता. हे स्कॅल्पला पोषण देण्यासोबतच त्याला केसांना यूवी डॅमेजपासूनही वाचवते.
टी ट्री ऑईल :
टी ट्री ऑईल हे एक इसेंशियल ऑईल आहे. ज्याचा समावेश तुम्ही तुमच्या स्किन आणि हेअर केअर रूटीनमध्ये करू शकता. आपल्या अँटिफंगल, अँटिबॅक्टेरिअल आणि अँटिइंफ्लेमेटरी प्रॉपर्टीज मुळे हे कोंडा आणि केसांमध्ये येणारी खाज दूर करते. याला तुम्ही कॅरियर ऑईलमध्ये मिक्स करुनही लावू शकता. कॅरियर ऑईल हा तेलाचा असा प्रकार आहे जो इतर तेलांना डायल्यूट करण्यासाठी वापरला जातो.
या तेलांचा वापर करुन तुम्ही केस आणि त्वचा दोघांचीही उत्तम काळजी घेऊ शकता.
हेही वाचा : High Fiber Vegetables : या भाज्यांनी फायबरची कमतरता होईल दूर
Edited By – Tanvi Gundaye