महिलांना नेहमीच आपली त्वचा छान आणि क्लिअर दिसावी असे वाटत असते. जेव्हा जेव्हा त्वचेची काळजी घेण्याचा प्रश्न येतो तेव्हा तेव्हा पार्लरमध्ये जाण्याचा विचार केला जातो. तसेच, बाजारातील अशा काही उत्पादनांचा वापर चेहऱ्यावर केला जातो जे लावल्यास आपली त्वचा काही काळ निरोगी राहते. मात्र यानंतर पुन्हा त्वचेच्या समस्या सुरू होतात. याचे कारण म्हणजे सौंदर्य उत्पादनांमध्ये वापरण्यात आलेले काही केमिकलयुक्त पदार्थ. बदलते हवामान हे देखील यामागील एक कारण आहे. अशा परिस्थितीतीवरचा उत्तम उपाय म्हणजे घरगुती फेसपॅकचा वापर करणे. कारण यात रासायनिक पदार्थांचा वापर केला जात नाही. आजच्या या लेखात जाणून घेऊयात सेन्सिटिव्ह आणि ऑइली स्किनसाठी काही बेस्ट होममेड पॅक्सविषयी.
सेन्सिटिव्ह त्वचेसाठी फेस पॅक
सेन्सिटिव्ह त्वचेवर काहीही वापरण्यापूर्वी आपण अनेक वेळा विचार करतो. कारण त्वचेच्या समस्यांचा धोका जास्त असतो. यामुळे आपण आपल्या त्वचेकरता काही उत्पादनांचा वापर करणे टाळायला हवे. आपल्या त्वचेला कोणत्या पदार्थांची ऍलर्जी आहे हे आधी तपासायला हवे. साधारणत: तुम्ही सेन्सिटिव्ह स्किनसाठी टोमॅटो आणि मध वापरू शकता. यामुळे तुम्हाला त्वचेची कोणतीही समस्या उद्भवणार नाही.
टोमॅटो आणि मधाचा फेस पॅक कसा वापरावा ?
टोमॅटो आणि मधाचा फेस पॅक बनवण्यासाठी, प्रथम एका भांड्यात टोमॅटोचा रस काढा.
त्यातून टोमॅटोचामधला भाग वेगळा करा. कारण बिया त्वचेवर लावता येत नाहीत.
नंतर त्यात 1 चमचा मध मिसळा.
या दोन्ही गोष्टी नीट मिसळा आणि त्यात चंदन पावडर घाला.
नंतर ते नीट एकजीव करा आणि चेहऱ्यावर लावा.
यानंतर ते 10 मिनिटे सुकू द्या.
नंतर पाण्याने चेहरा स्वच्छ करा.
यामुळे तुमची त्वचा निरोगी राहील.
तेलकट त्वचेसाठी फेस पॅक
बऱ्याच वेळा, तेलकट त्वचेसाठी, आपण सौंदर्य तज्ञांनी शिफारस केलेल्या गोष्टी वापरतो. कारण यामुळे त्वचेच्या कोणत्याही समस्या उद्भवत नाहीत. अशा परिस्थितीत, पपई आणि कोरफडीच्या जेलचा फेस पॅक चेहऱ्यावर लावणे हा उत्तम पर्याय आहे.जेणेकरून त्वचेवर मुरुमे किंवा इतर कोणत्याही प्रकारची समस्या उद्भवणार नाही.
पपई आणि कोरफड जेल फेस पॅक कसा बनवाल ?
यासाठी तुम्हाला एक पिकलेली पपई घ्यावी लागेल.
त्यात 1 चमचा एलोवेरा जेल मिसळा.
मिश्रण व्यवस्थित एकजीव करून चेहऱ्यावर लावा.
यानंतर, ते 10 मिनिटे तसेच राहू द्या.
नंतर पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्या.
हे लावल्याने तुमची त्वचा निरोगी राहील.
हे घरगुती फेस पॅक चेहऱ्यावर लावल्यास त्वचेची कोणतीही हानी होणार नाही. हे सगळे नैसर्गिक पदार्थ असल्याने चेहऱ्यावर त्याचे साईड इफेक्ट्स दिसण्याचाही धोका नसेल.
हेही वाचा : International Women’s Day 2025 : भारतीय महिलांना मिळणारे 10 कायदेशीर अधिकार
Edited By – Tanvi Gundaye