वेलची किंवा ज्याला इलायची असंही म्हटलं जातं. हा भारतीय स्वयंपाकघरातील एक मसाल्याचा पदार्थ आहे. याचा वापर केवळ खाण्यासाठीच नव्हे तर खाण्यामध्ये एक प्रकारचा सुगंध आणण्यासाठीही केला जातो. वेलची ही आरोग्य आणि सौंदर्य वाढवण्यासाठीही वापरली जाते. विशेषत: त्वचेसाठीही वेलचीचा वापर आयुर्वेदामध्ये करण्यात आला आहे.
यामध्ये अँटिऑक्सिडंटस, व्हिटामिन्स आणि मिनरल्स असतात. जे त्वचेला नैसर्गिक पद्धतीने स्वच्छ करतात. आणि चेहऱ्यावरची चमकही वाढवतात. या लेखातून जाणून घेऊयात वेलचीचा कसा वापर केला जातो आणि याचे काय-काय फायदे आहेत याबद्दल.
त्वचेकरता वेलचीचा वापर कसा करावा ?
वेलचीचा वापर तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने तुमच्या स्किन केयर रूटीनमध्ये करू शकता. जाणून घेऊयात काही
1. वेलची आणि मधाचा फेस मास्क :
मध आणि वेलची दोघांमध्येही अँटिबेक्टेरियल आणि अँटिइंफ्लेमेटरी गुण असतात. जे मुरूमे आणि पिंपल्स यांच्यापासून आराम देऊ शकतात. हा फेस मास्क त्वचेला मुलायम आणि स्वच्छ बनवतो.
कसा कराल वापर ?
2-3 वेलचीचे दाणे घ्या आणि त्यांना बारीक वाटून घ्या.
आता यामध्ये 1 चमचा मध टाकून नीट मिक्स करून घ्या.
ही पेस्ट चेहऱ्यावर 15 ते 20 मिनिटांसाठी लावा.
पेस्ट सुकल्यानंतर हलक्या कोमट पाण्याने चेहरा धुवून घ्या.
2. वेलची आणि नारळ तेलाचा फेस मास्क :
नारळाचे तेल आणि वेलचीचे मिश्रण त्वचेला मुलायम बनवते.हा स्क्रब विशेषत: कोरड्या त्वचेकरता फायदेशीर आहे.
कसा कराल वापर ?
काही वेलचीच्या दाण्यांना मिक्सरमध्ये वाटून घ्या आणि त्यांची पावडर तयार करा.
आता यात 1 चमचा नारळाचे तेल टाका.
या मिश्रणाला चेहऱ्यावर लावत हलक्या हातांनी मसाज करा.
5 ते 10 मिनिटांसाठी मसाज केल्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा.
3. वेलची आणि गुलाबजलाचा फेस टोनर :
गुलाबजल त्वचेला ताजेपणा देतो. तर वेलची त्वचेला साफ करण्याचे काम करते. यामुळे त्वचा चमकदार बनते. तुम्ही याचा वापर टोनर म्हणूनही करू शकता किंवा पेस्ट म्हणूनही.
कसा कराल वापर ?
3 ते 4 वेलचीचे दाणे घ्या आणि त्यांना गुलाबजलामध्ये रात्रभरासाठी भिजवत ठेवा.
दुसऱ्या दिवशी सकाळी हे मिश्रण गाळून घ्या आणि त्याला एका स्प्रे बाटलीमध्ये टाका.
हे टोनर चेहऱ्यावर स्प्रे करा किंवा याला कापसाच्या मदतीने त्वचेवर लावा.
4. वेलची आणि एलोवेरा जेल मास्क :
एलोवेरा अर्थात कोरफड त्वचेला हायड्रेट करण्याचं काम करते आणि सूज व जळजळीपासून आराम देते. जेव्हा हे वेलचीसोबत मिक्स केले जाते. तेव्हा त्वचेला मुलायम करण्यासाठी आणि चमक वाढवण्यासाठी हे फायदेशीर ठरते.
कसा कराल वापर ?
2 चमचे कोरफडीचे जेल घ्या.
यामध्ये चिमूटभर वेलची पावडर मिसळा.
या मिश्रणाला चेहऱ्यावर लावा आणि 20 मिनिटांसाठी असेच राहू द्यात.
यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा.
हेही वाचा :
Edited By – Tanvi Gundaye