Beauty Tips : चमकदार त्वचेसाठी कॉफी फेसपॅक नक्की ट्राय करा

आपला चेहरा नेहमी चमकदार दिसावा असं सगळ्यांनाच वाटतं, त्यासाठी अनेकजण महागड्या केमिकलयुक्त प्रोडक्ट्सचा देखील वापर करतात, पण हे सर्व उपाय बऱ्याचदा काहीही उपयोग होत नाही, उलट कधी कधी याचे दुष्परिणाम तुम्हाला भोगावे लागतात. अशावेळी तुम्ही स्वस्तात घरगुती उपाय करून तुमचा चेहरा चमकदार बनवू शकता.

अशा पद्धतीने बनवा कॉफी फेसपॅक

  • हेल्थ एक्सपर्ट्सच्या मते, कॉफी आपल्या शरिरासोबतच आपल्या चेहऱ्यासाठी देखील फायदेशीर असते.
  • यासाठी तुम्ही ४ चमचे कॉफीमध्ये १ चमचा नारळाचे तेल आणि मध, गुलाबपाणी मिक्स करून ही पेस्ट तुमच्या चेहऱ्याला लावा.
  • २५ मिनीटांपर्यंत तुमच्या चेहऱ्याला लावून ठेवा. या उपायाने तुमची त्वचा चमकदार होईल.

कॉफीच्या फेसपॅकचे हे आहेत फायदे

  • कॉफी फेसपॅकने तुमची त्वचा चमकदाक बनते शिवाय चेहऱ्यावरील काळसर डाग सुद्धा कमी होतात.
  • तसेच चेहऱ्यातील तेलकटपणा कमी होऊन चेहरा चेहरा सॉफ्ट व्हायला मदत होते.
  • या उपायाने तुमचा चेहऱ्यावरील त्वचा नेहमी टवटवीत राहिल, या उपाय आठवड्यातून एकदा तरी नक्की करायला हवा.

 


हेही वाचा :पावसात भिजण्यापूर्वी केसांची काळजी घेण्यासाठी ‘या’ टिप्सचा नक्कीच उपयोग होईल