Tuesday, February 18, 2025
HomeमानिनीBeautyBeauty Tips : आईस रोलरने मिळवा चमकदार त्वचा

Beauty Tips : आईस रोलरने मिळवा चमकदार त्वचा

Subscribe

आपण सगळेच आपल्या त्वचेची काळजी घेण्यासाठी निरनिराळी साधने वापरत असतो. त्यापैकीच एक म्हणजे आईस रोलर. आईस रोलर हे एक असं स्किनकेअर टूल आहे जे त्वचेचा पफीनेस म्हणजे सुजलेपण कमी करण्यापासून ते त्वचेची होणारी जळजळ आणि मुरुमं घालवण्यासाठी मदत करते. जेव्हा तुम्ही तुमच्या स्किनकेअर रुटीनमध्ये याचा समावेश करता तेव्हा तुमचं स्किन टेक्स्चर यामुळे इम्प्रूव्ह होऊ शकतं.

आईस रोलर हे एक असं टूल आहे की ज्याच्यामध्ये एक हँडल असतं आणि एक रोलिंग हेड असतं. या रोलिंग हेडमध्ये पाणी किंवा कूलिंग जेल असतं ज्याला फ्रीज केलेलं असतं. जेव्हा याला त्वचेवर आपण फिरवतो तेव्हा हे केवळ शरीराला थंडपणाच देत नाही तर यामुळे रक्ताभिसरणाची क्रियाही सुधारते. याला वापरण्याचे अनेक फायदे आहेत परंतु यासाठी महत्त्वाचं आहे ते म्हणजे याचा योग्य रितीने वापर करणे. जाणून घेऊयात नेमका हा आईस रोलर वापरायचा कसा याबद्दल.

आधी त्वचा स्वच्छ करून घ्या :

जेव्हा कधी तुम्ही तुमच्या त्वचेवर आईस रोलरचा वापर करता तेव्हा त्याआधी तुमची त्वचा नीट स्वच्छ करून घ्या. जेव्हा तुम्ही त्वचा साफ करून घेता तेव्हा त्वचेची जळजळ होणे किंवा मुरुमं येणे यांची शक्यता कमी होते.

फ्रीझरमध्ये करा स्टोअर :

आईस रोलर मध्ये एक कूलिंग जेल असतं. त्याचा कूलिंगपणा कायम ठेवण्यासाठी नेहमी हा रोलर फ्रीजर मध्ये ठेवून द्या. याला तुम्ही केव्हाही आरामात वापरू शकता. सोबतच रोलरचा थंडपणा पफीनेस आणि जळजळ शांत करायला मदत करतो. विशेषकरून तुम्हाला डोळ्यांच्या आजूबाजूला पफीनेसची समस्या असेल तर तुम्ही त्या भागांवर हा रोलर फिरवू शकता.

सकाळी करा वापर :

खरंतर आईस रोलरचा वापर कधीही केला जाऊ शकतो. पण जर तुम्ही तुमच्या त्वचेला रिफ्रेशिंग फील देऊ इच्छित असाल तर सकाळी याचा वापर करा. यामुळे तुमची त्वचा अधिक फ्रेश राहू शकेल आणि तुम्हाला सकाळी एनर्जेटिकदेखील वाटेल.

सीरम किंवा मॉइश्चरायझरचा करा वापर :

आईस रोलर वापरण्यापूर्वी तुम्ही तुमच्या त्वचेच्या अनुसार सीरम किंवा मॉइश्चरायझर लावा. असे केल्याने प्रॉडक्ट त्वचेमध्ये अधिक चांगल्या पद्धतीने मुरू शकेल आणि त्याचे तुम्हाला चांगले रिझल्ट मिळतील. याशिवाय तुम्ही याला रोज वापरण्याचा प्रयत्न करा.

 

Manini