ऋतुमानात होणाऱ्या बदलांनुसार, त्वचेच्या अनेक समस्यांना आपल्याला सामोरे जावे लागते. ज्यापासून सुटका मिळवण्याकरता लोक हजारो रुपये खर्च करुन स्किन ट्रीटमेंटही घेतात. या ऋतूंमध्ये विशेषत: लोक मुरुमे आणि ब्लॅकहेडस् मुळे जास्त चिंतेत असतात.
मुरुमांपासून सुटका मिळवणे तसे सोपे आहे. परंतु चेहऱ्यावर ब्लॅकहेडस येऊ लागले तर मात्र आपल्या सौंदर्यावर त्याचा परिणाम पडतो. यापासून
सुटका मिळवण्यासाठी तुम्ही पार्लरला जाऊ शकता. परंतु अनेकांकडे पार्लरमध्ये जाण्यासाठी फार वेळ नसतो. अशात तुम्ही घरगुती उपाय वापरुन या समस्यांपासून दूर राहू शकता.
जर तुमच्या सौंदर्याला देखील ब्लॅकहेडस् डाग लावत असतील तर तुम्ही घरीच काही पदार्थांचा वापर करुन यापासून सुटका मिळवू शकता. जाणून घेऊयात ब्लॅकहेडस हटवण्यासाठी कमी खर्चात उपयोगी ठरणाऱ्या काही उपायांविषयी.
अंडे :
अनेकजण असे आहेत की जे अंड्याचे सेवन करत नाहीत. परंतु तुम्ही अंड्याला तुमच्या स्किन केयर रुटीनचा भागदेखील बनवू शकता. अंड्याच्या पांढऱ्या भागात असलेले पोषणतत्त्वं तुमच्या चेहऱ्यावरील ब्लॅकहेडस् घालवण्यास मदत करू शकतील. तुमची त्वचा चमकदार बनवण्यासाठीही हे फायदेशीर ठरतील.
असा करा वापर :
अंड्यांचा मास्क बनवण्यासाठी केवळ अंड्याचा पांढरा भाग आणि एक चमचा मध यांची आवश्यकता आहे. हे दोन्ही पदार्थ एकत्र करुन चेहऱ्यावर थोड्या वेळासाठी लावा. काही वेळानंतर चेहरा धुवून घ्या. यामुळे ब्लॅकहेडस् गायब होतील. या पॅकचा वापर तुम्ही आठवड्यातून दोन वेळा करू शकता.
कोरफड :
प्रत्येक घरात कोरफड ही सहज मिळणारी वनस्पती आहे. हे त्वचेची छिद्रे मोकळी करते. आणि त्वचेला स्वच्छ करण्याचे काम करते. याचा मास्क बनवून तुम्ही मुरुमे आणि ब्लॅकहेडस् यासारख्या समस्यांपासून सुटका मिळवू शकता.
असा करा वापर :
कोरफडीचा वापर फेस मास्कसाठी करण्याकरता सर्वात आधी कोरफडीचा ताजा गर काढून घ्या. हाच गर अर्थात जेल 10 मिनिटांकरता चेहऱ्यावर लावा.आणि नंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. याचा दररोजही वापर तुम्ही करू शकता.
ग्रीन टी :
आरोग्यासाठी फायदेशीर ठरणारी ग्रीन टी त्वचेकरताही लाभदायक असते. ग्रीन टीमध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंटस असतात. जे ब्लॅकहेडस् काढून टाकण्यास मदत करतात.
असा करा वापर :
याचा पॅक बनवण्यासाठी सर्वात आधी ग्रीन टीची सुकलेली पाने घ्या. आता यांना मिक्सरमध्ये वाटून घेऊन त्यात थोडं पाणी टाका आणि याची पेस्ट तयार करून घ्या. आता ही पेस्ट 15 ते 20 मिनिटांकरता चेहऱ्यावर लावा. नंतर चेहरा धुवून घ्या. आठवड्यातून दोन वेळा या पॅकचा वापर केल्यास तुम्हाला याचा परिणाम दिसू लागेल.
हेही वाचा : Potato peels for cleaning : बटाट्याची साल फेकून देताय?
Edited By – Tanvi Gundaye