घरताज्या घडामोडीBeauty Tips : पार्लरमध्ये जायला वेळ नाही, मग घरातच करा मिनी फेशिअल

Beauty Tips : पार्लरमध्ये जायला वेळ नाही, मग घरातच करा मिनी फेशिअल

Subscribe

आपली त्वचा सुंदर आणि निरोगी राहण्यासाठी प्रत्येकजण धडपड करत असतो. याशिवाय अनेकजण पार्लरमध्ये जाऊन महागडे फेशिअल करुन आपला चेहरा खुलवण्याचा प्रयत्न करतात.मात्र कालांतराने फेशिअलमुळे चेहरा खराब होण्याची देखील शक्यता असते. परंतु घरच्या घरी फेशिअल केल्याने चेहरा उजळण्यास मदत होऊन चेहऱ्यावर काही अपाय देखील होत नाही. त्यासाठी घरच्या घरी पार्लरसारखा लूक येण्यासाठी खालील स्टेप्ल फॉलो करा.

क्लिंजिंग

- Advertisement -

१) कोणत्याही प्रकारचे फेशिअल करताना आधी चेहऱ्यावरील तेलकटपणा हटवणे गरजेचे आहे. त्यासाठी चेहरा चांगल्या प्रकारे धुऊन टाका.जर तुमच्या चेहऱ्यावर थोडासा जरी मेकअप असेल तर, चेहऱ्याला ऑईल क्लींजरने साफ करा.त्यानंतर नियमित वापरण्याच्या फेस क्लींजरने पुन्हा एकदा क्लींजिग करा.तुम्ही फेशियल ऑइलसाठी नारळाचे तेल किंवा ऑलिव ऑइल वापरु शकता.

टोनिंग

- Advertisement -

२) दुसऱ्या स्टेपमध्ये क्लिंजिंग झाल्यानंतर टोनिंग करावी लागते.यासाठी तुम्ही तुमच्या चेहऱ्यासाठी नियमित वापरात असणारे टोनर वापरु शकता.जर तुमच्याकडे कोणतेही टोनर नसेल तर, तुम्ही नॉर्मल गुलाब पाण्याचा वापर करु शकता.आपल्या क्लिंजिंग केलेल्या चेहऱ्यावर गुलाब पाण्याचा स्प्रे मारा.

स्टीमिंग

३) स्क्रब झाल्यानंतर चेहरा स्वच्छ धुऊन घेणे. त्यानंतर चेहऱ्याला स्टीमिंग करावे. याकता पाणी गरम करुन त्याची वाफ घ्यावी. यामुळे चेहऱ्यावरील ऑपन पोल्स क्लिन होऊन चेहऱ्यावरील घाण निघून जाण्यास मदत होते.

 

स्क्रबिंग


४) हे स्क्रब बनवण्यासाठी ओट्सचा वापर करु शकता. ओट्स त्वचेवर खूप कोमल असतात आणि ते त्यांच्या दाहक-विरोधी गुणधर्मांमुळे त्वचेसाठी उत्तम असतात.

पध्दत :-

एका लहान वाडग्यात, २ चमचे बारीक ओटचे जाडे भरडे पीठ आणि १ टीस्पून मध एकत्र करा.१ टेबलस्पून कोमट पाणी घाला आणि चांगले मिसळा,संपूर्ण चेहऱ्यावर बोटांनी स्क्रब लावा आणि एक मिनिट मसाज करा.नंतर ४ मिनिटे असेच राहू द्या. कोमट पाण्याने चेहरा धुवा.

फेस मास्क

५) चेहऱ्याचा अशुद्धपणा बाहेर काढण्यासाठी फेसमास्क उपयुक्त ठरतो आणि चेहरा ग्लो करतो.

साहित्य :

केळी – १
कोरफडीचे जेल – 2 चमचे
बदाम तेल – ३ टीस्पून

पद्धत :

एका स्वच्छ भांड्यात केळ्याचे काप घ्या आणि काट्याने मॅश करा.
या मॅश केलेल्या केळीमध्ये कोरफड जेल घाला.
नंतर त्यात बदामाचे तेल टाका.
ते चांगले मिसळा आणि तुमचा पॅक तयार आहे.
हा पॅक चेहऱ्यावर लावा.
१५ मिनिटे राहू द्या. त्यानंतर चेहरा स्वच्छ धुऊन टाका

मॉइस्चराइज

६) चेहरा धुऊन झाल्यानंतर चेहऱ्याला ताज्या कोरफडीचा गर काढून लावावा.


हे ही वाचा – ऑक्सिजन अभावी किती मृत्यू झाले याची माहिती महाराष्ट्राने दिली नाही; आरोग्यमंत्र्यांची लोकसभेत माहिती


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -