आपली त्वचा गोरी आणि उजळ दिसावी असे आपल्या सर्वांनाच वाटते. त्वचेवरील डाग आपला चेहरा काळसर आणि निस्तेज करतात. तुम्हाला बाजारात अशी अनेक प्रकारची आवश्यक तेले सापडतील, जी त्वचेला अधिक उजळ बनवण्यासाठी वापरली जातात.
तेल लावल्याने त्वचेला पोषण मिळते आणि त्वचेची गुणवत्ताही सुधारते. हे तेल तुमच्या त्वचेवर क्लीन्सर म्हणूनही काम करतात, ज्यामुळे त्वचा गोरी होते आणि त्वचेचा पोत सुधारतो. हल्ली लोक सेंद्रिय आणि नैसर्गिक तेलांचा वापर त्वचेसाठी करताना दिसतात. तुम्हालाही तुमच्या टोन आणखी सुधारायचा असेल, तर ही तेले तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतात.
लॅव्हेंडर तेल :
लॅव्हेंडर ऑइलचा वापर स्किन क्रीम आणि साबण बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर केला जातो. हे तेल त्वचेवरील डाग दूर करण्याचे काम करते.यामुळे त्वचा गुळगुळीत आणि मॉइश्चराइज होते.
एरंडेल तेल :
हे तेल मुरुमे, वृद्धत्वाच्या चेहऱ्यावर दिसणाऱ्या सुरकुत्या दूर करण्यासाठी उपयुक्त आहे. हे त्वचेचा रंग देखील साफ करते आणि त्वचेच्या छिद्रांमध्ये अतिरिक्त तेलही जमा होऊ देत नाही. यात नैसर्गिक अँटीव्हायरल आणि अँटीमाइक्रोबियल गुणधर्म असतात, जे त्वचारोग आणि फंगल इन्फेक्शन सारख्या त्वचेच्या समस्यांपासून आपला बचाव करतात.
खोबरेल तेल :
खोबरेल तेल मुरुमे, पुरळ, त्वचेचे डाग आणि चट्टे बरे करण्यास मदत करते. एवढेच नाही तर हे तेल लावल्याने त्वचेवरील स्ट्रेच मार्क्सही कमी होतात. स्वयंपाक, सौंदर्य उत्पादने, केसांचे पोषण इत्यादी अनेक गोष्टींसाठी या तेलाचा वापर केला जातो.
गाजराच्या बियांचे तेल :
गाजराच्या बियांच्या तेलामध्ये बीटा-कॅरोटीन असते, ज्यामुळे त्वचेचा रंग उजळण्यास मदत होते. ते लावल्याने पिगमेंटेशन आणि सुरकुत्या दूर होतात.
चंदन तेल:
हे तेल त्वचेला मॉइश्चरायझ करते आणि चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करण्यास मदत करते. हे तेल नियमितपणे लावल्याने त्वचा गुळगुळीत होते आणि त्वचेचा टोन हलका होतो. रात्रीच्या वेळी त्वचेची निगा राखण्यासाठी बदामाच्या तेलात चंदनाचे तेल मिसळा.
टी ट्री ऑईल :
टी ट्री ऑईल हे मुरुमांच्या चट्टे, त्वचेचा रंग आणि त्वचेच्या इतर नुकसानांवर उपचार करण्यासाठी एक प्रभावी उपाय आहे. चहाच्या पानांपासून हे तेल काढले जाते. अरोमाथेरपीमध्ये आणि अँटीसेप्टिक म्हणून देखील हे तेल वापरतात. सौंदर्यप्रसाधनांमध्ये देखील हे तेल वापरतात.
लिंबू तेल :
त्वचेचे डाग हलके करण्यासाठी लिंबू तेल हे सर्वोत्कृष्ट आवश्यक तेलांपैकी एक आहे कारण त्यात सायट्रिक ऍसिड आणि लिमोनिन हे दोन मुख्य नैसर्गिक ब्लीचर्स असतात. या दोन्हीमुळे त्वचेचा रंग उजळण्यास मदत होते.
हेही वाचा : Winter Health : हिवाळ्यात ‘चाकवत’ करते जीवनसत्त्वांची पूर्तता
Edited By – Tanvi Gundaye