Sunday, February 16, 2025
HomeमानिनीBeautyBeauty Tips : साडीवर या पारंपरिक हेअरस्टाइल्स दिसतील क्लासी

Beauty Tips : साडीवर या पारंपरिक हेअरस्टाइल्स दिसतील क्लासी

Subscribe

सणासुदीचे दिवस म्हटलं की महिला आवर्जून साडी नेसतात. नऊवारी, सहावारी, पारंपरिक, वेलवेट, शिफॉन अशा वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या प्रसंगानुरूप नेसण्याला महिला प्राधान्य देतात. साडी नेसली की गळ्यातलं, कानातले, बांगड्या, पैंजणे या सगळ्या दागिन्यांचा विचार महिला करत असतात. त्यासोबतच केसांचं काय करायचं हा प्रश्नदेखील प्रत्येकीला पडलेला असतो. साडीसह परफेक्ट हेअरस्टाइल तयार करण्याचा विचार जेव्हा येतो तेव्हा आपण काही नेहमीच्या पर्यायांशिवाय इतर फार काही विचार करत नाही. साधे मोकळे केस किंवा अंबाडा हा आजकाल अगदी सामान्य झाला आहे. यापेक्षा वेगळ्या हेअरस्टाइलचा विचार फारसा केला जात नाही. साडी नेसल्यानंतर सुंदर पद्धतीने केस विंचरले तर साडीवरचा लूक अधिक आकर्षक आणि उठावदार दिसतो.

उदाहरणार्थ, समजा तुम्ही कांजीवरम सिल्कची साडी नेसली असेल, तर त्यासोबत साधा अंबाडा किंवा लांबसडक वेणी सुंदर दिसते. तुमच्या दैनंदिन केशरचने व्यतिरिक्त, तुम्ही लग्नाच्या फंक्शन्ससाठी आणि तुमच्या साडीसोबत नवीन लूक मिळवण्यासाठी वेगवेगळ्या हेअरस्टाइल ट्राय करत रहायला हव्यात. यासाठीच आज जाणून घेऊयात साडीवर करता येण्याजोग्या काही पारंपरिक हेअरस्टाइल्सविषयी.

मेस्सी बन :

Beauty Tips These traditional hairstyles will look classy on a saree
Beauty Tips : साडीवर या पारंपरिक हेअरस्टाइल्स दिसतील क्लासी – मेस्सी बन (Image Source : Social Media)

अगदी झटपट होणारी ही हेअरस्टाइल आहे. मेस्सी बन म्हणजेच सगळे केस एकत्र करून मानेच्या थोड्या वरील भागात साधासा अंबाडा बांधला जातो. अंबाडा बांधल्यानंतर जे केस अंबाड्यामध्ये नसतात त्या केसांना स्ट्रेटनर द्वारे स्ट्रेट केले जाते. या अंबाड्यावर मॅचिंग असे फूलही तुम्ही लावू शकता.

स्लिक बन :

Beauty Tips These traditional hairstyles will look classy on a saree
Beauty Tips : साडीवर या पारंपरिक हेअरस्टाइल्स दिसतील क्लासी – स्लिक बन (Image Source : Social Media)

स्लिक बन म्हणजे समोरून पूर्ण सपाट असणारे केस. आणि मागे बांधला जाणारा अंबाडा. ही हेअरस्टाइल बॉलीवूड जगतात विशेष लोकप्रिय आहे. दीपिका, आलिया अशा अनेक अभिनेत्री ही हेअरस्टाइल करताना आपल्याला दिसतात.ज्यांना ही हेअरस्टाइल करायची असते त्यांना समोरून बटा किंवा रोल अशी केशरचना नको असते. काही महिला तर वॅक्सचा देखील वापर करतात जेणेकरून समोरील केस सपाट दिसावेत.

खोपा :

Beauty Tips These traditional hairstyles will look classy on a saree
Beauty Tips : साडीवर या पारंपरिक हेअरस्टाइल्स दिसतील क्लासी – खोपा (Image Source : Social Media)

तुम्ही जर नऊवारी साडी नेसणार असाल तर त्यावर सर्वात सुंदर अशी हेअरस्टाइल म्हणजे खोपा. या हेअरस्टाइलमध्ये मानेवर साधीशीच वेणी बांधून ती गुंडाळली जाते आणि त्यावर खोपा घातला जातो. अशा खोप्यावर पारंपरिक फूल, चाफा किंवा गुलाबाच्या पाकळ्या अशा वेगवेगळ्या पद्धतीची सजावट देखील करता येऊ शकेल. यावर तुम्ही सोने किंवा चांदीच्या हेअर ऍक्सेसरीज देखील सजावट म्हणून वापरू शकता.

बट हेअरस्टाइल :

Beauty Tips These traditional hairstyles will look classy on a saree
Beauty Tips : साडीवर या पारंपरिक हेअरस्टाइल्स दिसतील क्लासी – बट हेअरस्टाइल (Image Source : Social Media)

जर तुम्हाला बन हेअरस्टाइल आवडत नसेल तर तुम्ही बट हेअरस्टाइल ट्राय करू शकता. ही हेअरस्टाइल करताना मध्यभागी पार्टिशिअन करून 2 बटांची वेणी बांधून मागे पिनअप करायचे. व केस मोकळे सोडायचे. तुम्ही या मोकळ्या केसांवरून मोगऱ्याचा गजरा सोडू शकता. किंवा फुलांची दोन्ही कानांच्या मधून अर्धचंद्रासारखी रचना करता येऊ शकते.

हेही वाचा : Kitchen Tips : चहाची गाळणी स्वच्छ करण्याच्या सोप्या ट्रिक्स


Edited By – Tanvi Gundaye

Manini