Beauty Tips : सुंदर नितळ त्वचेसाठी असा बनवा तांदळाचा फेसपॅक

अनेकजण सुंदर दिसण्यासाठी अनेक महागड्या केमिकलयुक्त कॅस्मेटीक्सचा वापर करतात. पण तरीही चेहऱ्यावर आपल्याला हवा तसा ग्लो पाहायला मिळत नाही

सुंदर दिसायला कोणाला नाही आवडत? अनेकजण सुंदर दिसण्यासाठी अनेक महागड्या केमिकलयुक्त कॅस्मेटीक्सचा वापर करतात. पण तरीही चेहऱ्यावर आपल्याला हवा तसा ग्लो पाहायला मिळत नाही. उलट काही वेळा कॅस्मेटीक्सचा अति वापर केल्यामुळे चेहरा जास्तच खराब होतो. अशावेळी आपला चेहऱ्यावरील डाग कमी करण्यासाठी आणि त्वचा कायमची साफ करण्यासाठी तुम्ही या घरगुती गोष्टींचा वापर नक्कीच करु शकता.

तांदळाचा वापर करून तुमचा चेहरा चमकदार बनवा

स्किन एक्सपर्ट्सच्या मते तांदळाच्या पिठामध्ये अॅंन्टी ऑक्सीडेंट, विटामिन आणि फोलिक अॅसिड असते. ज्यामुळे आपल्या चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते. हे आपल्या चेहऱ्यावरील सूक्ष्म छिद्रांना बंद करण्यास मदत करते. तांदळाच्या फेसपॅकच्या नियमीत वापराने चेहऱ्यावरील डाग कमी होतात.

तांदळाचा फेसपॅक कसा बनवावा

साहित्य :
२ चमचे तांदळाचे पीठ
१ चमचा कोरफडीचा गर
चिमुटभर हळद
गुलाबजल

कृती :

  • सगळ्यात आधी एका भांड्यात या सर्व गोष्टी एकत्र करा. आता ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि कमीत कमी ५ मिनीटांपर्यंत मसाज करा. १५ ते २० मिनीट हा मास्क तसाच ठेवा. त्यानंतर हलक्या गरम पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्या.
  • हा फेसपॅक आठवड्यातून २ ते ३ वेळा चेहऱ्याला लावल्याने नक्कीच तुम्हाला याचा चांगला फायदा होईल.