घरलाईफस्टाईलBeauty Tips : चेहऱ्यावरील काळपटपणा दूर करण्यासाठी करा स्वयंपाकघरातील 'या' गोष्टींचा वापर

Beauty Tips : चेहऱ्यावरील काळपटपणा दूर करण्यासाठी करा स्वयंपाकघरातील ‘या’ गोष्टींचा वापर

Subscribe

मधामध्ये अँटीऑक्सीडेंट्स, अँटीबॅक्टीरियल हे गुण भरपूर प्रमाणात असतात. तर हळद आणि बेसनमध्ये देखील अनेक औषधी तत्व आढळतात.

चेहऱ्यावर बेसन, हळद आणि मध यांचे मिश्रण लावल्याने त्वचेच्या अनेक समस्यांपासून सुटका होते. बाजारातील केमिकलयुक्त प्रोडक्ड्सपेक्षा स्वयंपाकघरातील या औषधी गोष्टींमुळे तुम्हाला अनेक फायदे होऊ शकतात. मधामध्ये अँटीऑक्सीडेंट्स, अँटीबॅक्टीरियल हे गुण भरपूर प्रमाणात असतात. तर हळद आणि बेसनमध्ये देखील अनेक औषधी तत्व आढळतात. या तिन्ही गोष्टींचं एकत्रीत मिश्रण चेहरा चमकदार करण्यासाठी खूप फायदेशीर आहे.

चेहऱ्यावर बेसन, हळद आणि मध लावण्याचे फायदे :

- Advertisement -

  • चमकदार त्वचेसाठी
    बेसन पीठ चेहरा मॉइश्चराइज करतो. तुमचा चेहरा चमकदार दिसत नसेल. तर तुम्ही बेसन आणि मध यांचे मिश्रण एकत्र करून आठवड्यातून २ ते ३ वेळी लावून मसाज करा.
  • चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी
    स्किन टाइट करण्यासाठी चेहवर बेसन, हळद आणि मध यांचे मिश्रण एकत्र करून लावा. यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होऊ लागतील.
  • चेहऱ्यावरील काळपटपणा कमी करण्यासाठी
    चेहऱ्यावरील काळपटपणा दूर करण्यासाठी बेसन, हळद आणि गुलाब पाणी यांची पेस्ट तयार करून आठवड्यातून २ ते ३ वेळी लावून मसाज करा आणि १५ मिनिटांनी थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्या.

हेही वाचा :Beauty Tips : चमकदार त्वचेसाठी कॉफी फेसपॅक नक्की ट्राय करा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -