घरलाईफस्टाईलबेडशीट धुताना तुम्ही सुद्धा 'ही' चूक करता?

बेडशीट धुताना तुम्ही सुद्धा ‘ही’ चूक करता?

Subscribe

बेडवर टाकलेली बेडशीट गादी घराब होऊ नये किंवा बेडरुमचा लूक बदलण्यासाठीच नसते. तर तुमची झोप पूर्ण करण्याचे सुद्धा काम करते. यामुळे बेडशीट्सच्या क्विलिटी आणि त्याच्या ठेवणीवर ही लक्ष द्यावे. एक अस्वच्छ बेडशीट पाहुण्यांसमोर तुम्हाला अन्कंम्फर्टेबल फिल करुन देईल. त्यामुळे बेडशीट नक्की कशी स्वच्छ करावी हे तुम्हाला कळले पाहिजे. (Bedsheet cleaning tips)

बेडशीट धुताना तुम्ही सुद्धा पुढील काही चुका करत असाल तर त्या लगेच बदला. यामुळे तमुची बेडशीट दीर्घकाळ नवी दिसेलच आणि व्यवस्थितीत ही राहिल.

- Advertisement -

-केवळ अस्वच्छ दिसतेय म्हणून धुणे
तुम्ही बेडशीट तो पर्यंत धुवायला टाकत नाही जो पर्यंत ती अस्वच्छ झालेली नसते. जर तुम्ही सुद्धा अशी चुक करत असाल तर आता ती करु नका. असे केल्याने त्यावर अतिरिक्त डस्ट आणि घामामुळे अत्याधिक बॅक्टेरिया जमा होऊ शकतो. ज्यामुळे केवळ चादरच नव्हे तर त्याची क्वालिटी ही बिघडते. असे करणे तुमच्या आरोग्यासाठी ही हानिकारक ठरु शकते.

- Advertisement -

-दुसऱ्या कपड्यांसोबत बेडशीट धुणे
प्रत्येक कपड्यांचे फॅब्रिक वेगळे असते. त्यामुळे ते कसे धुतले पाहिजेत याची पद्धत ही वेगळी असते. परंतु जर तुम्ही बेडशीट ही अन्य कपड्यांसोबत धुतली तर त्या स्वच्छ होत नाहीत. या व्यतिरिक्त बटण किंवा चैन बेडशीटमध्ये अडकल्यास ती फाटू शकते. (Bedsheet cleaning tips)

-अधिक डिटर्जेंटचा वापर
जर बेडशीट खुप अस्वच्छ असेल तर ती स्वच्छ धुण्यासाठी सहाजिकच अधिक डिटर्जेंटची गरज भासते. पण असे करणे ही चुकीचे आहे. याचा अधिक वापर केल्याने बेडशीटचा रंग निघून जातो आणि त्या लवकर फाटण्याची ही शक्यता असते.

-गरम पाण्याने धुणे
काही लोक असे मानतात की, गरम पाण्याने बेडशीट धुतल्याने ती स्वच्छ निघते. पण तुमचा हा गैरसमज फार चुकीचा आहे. कारण गरम पाण्यामुळे डाग अधिक घट्ट होतात. ऐवढेच नव्हे तर फॅब्रिकही त्याचे कमजोर होते.


हेही वाचा- भांडी घासताना साबण गळतोय, मग वापरा ‘ही’ आयडिया

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -