Tuesday, April 23, 2024
घरमानिनीHealthहिवाळ्यात पिकनिकला जाण्याआधी 'या' वस्तू ठेवा सोबत

हिवाळ्यात पिकनिकला जाण्याआधी ‘या’ वस्तू ठेवा सोबत

Subscribe

सध्या देशभरात थंडीची लाट पसरली आहे. याकाळात अनेकजण कुटुंबिय किंवा मित्रांसोबत पिकनिक प्लॅन करतात. हिवाळ्यातील पिकनिक नक्कीच आपल्याला रिफ्रेश करणारी ठरते. पण हिवाळ्यात प्रवास करताना आरोग्याची काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

हिवाळ्यात पिकनिकला जाताना अशी ‘घ्या’ काळजी

Everything You Need to Know About How to Store Wool Sweaters

- Advertisement -

 

  • उबदार कपडेसोबत ठेवा

तुम्ही ज्या ठिकाणी जात आहात त्या ठिकाणाच्या तापमानाची माहिती जाणून घ्या. त्यानुसार उबदार कपडेसोबत घेऊन जा. त्यासोबत वयस्कर व्यक्ती आणि लहान मुले असल्यास शालीसारखे कपडे घेऊन जा.

- Advertisement -
  • त्वचेच्या संरक्षणासाठी

हिवाळ्यात त्वचा कोरडी पडते आणि शरीराला खाज सुटते. त्यामुळे अनेकांचे रक्त देखील येते. अशावेळी कोल्डक्रिम, तेल, लीपबाम यांसारख्या त्वचेला मऊ ठेवतील अशा गोष्टी सोबत ठेवा.

  • पाय आखडणे

हिवाळ्यात बऱ्याच जणांना सांधेदुखीचा त्रास उद्भवतो. अशा व्यक्तींनी विशेष काळजी घेणे गरजेचे असते. अशातच, जर तुम्ही पिकनिककरता निघाला असाल तर प्रवासादरम्यान बऱ्याचदा पाय आणि शरीराचे सांधे आखडण्याची शक्यता असते. अशावेळी प्रवासात जर स्वत:ची गाडी असेल तर ठराविक वेळाने ती थांबवून खाली उतरा परंतु, जर रेल्वेने प्रवास करत असाल तर रेल्वेमध्ये एखादी चक्कर जरुर मारा.

Picnic Checklist: Must-Haves for an Outdoor Feast

 

  • हेल्दी स्नॅक्स

प्रवासात अचानक भूक लागल्यावर खाण्यासाठी हेल्दी स्नॅक्ससोबत ठेवा. ज्यामध्ये केळीचे वेफर्स, खाकरा, चकली, चिक्की, भाकर वडी यांसारखे पदार्थ घ्यावे.

  • घसा दुखी

बऱ्याचदा पिकनिकसाठी बाहेर पडलो का मग तेलकट पदार्थ खाल्ल्याने, थंड पाणी प्यायल्याने घसा दुखतो. अशावेळी गरम पाण्याचे सेवन करा. अथवा चहा किंवा कॉफीचे सेवन करा. यामुळे आराम मिळतो.

  • उलटी, ताप येणे

पिकनिकला जाताना स्वत:सोबत तापावरच्या काही गोळ्या, सर्दीसाठी बाम अशावस्तू सोबत ठेवा. कारण एखाद्या नवीन ठिकाणी लगेच डॉक्टर भेटणं कठीण असतं. त्यामुळे अशावेळी औषधांचा उपयोग होतो.


हेही वाचा :

कॅम्पिंगचा प्लॅन करताय? मग ‘या’ टिप्स फॉलो करा

- Advertisment -

Manini