Friday, April 19, 2024
घरमानिनीHealthपोटावरची चरबी घालवतील 'हे' ड्रिंक्स

पोटावरची चरबी घालवतील ‘हे’ ड्रिंक्स

Subscribe

ज्या लोकांना आपल्या लाइफस्टाइलमध्ये बदल करुन वजन कमी करायचे असेल तर त्यांनी हेल्दी ड्रिंक्सचा समावेश ही आपल्या आहारात सहभागी करावेत. हेल्दी ड्रिंक तयार करणे फार सोप्पे असून अत्यंत फायदेशीर मानले जाते. या हेल्दी ड्रिंक्समधून तुम्हाला 20 कॅलरी, 3 ग्रॅम कार्बोहाइड्रेट, विटामिन सी- 34.8 मिलीग्राम मिळते. (Belly fat loss drinks)

काय कराल?
एक चमचा सब्जाच्या बिया, एक ग्लास गरम पाणी, दोन चमचा मध, अर्ध्या लिंबूचा रस आणि काही लिंबूचे तुकडे.

- Advertisement -

कसे तयार कराल?
सर्वात प्रथम एका ग्लासात गरम पाणी घ्या
आता त्यात सब्जा, मध, लिंबूचा रस असे व्यवस्थितीत एकत्रित करा
असे केल्यानंतर अर्धा तास ते भिजवून ठेवा
भिजल्यानंतर यामध्ये लिंबूचे तुकटे टाका आणि दररोज सकाळी उपाशी पोटी प्या
तुम्ही ते तुमच्या आवडीच्या ज्यूस मध्ये सुद्धा मिक्स करु शकता

- Advertisement -

जिऱ्याचे पाणी
जिऱ्याच्या पाणी एक उत्तम लो-कॅलरी ड्रिंक्स आहे. यामुळे पचक्रियेला प्रोत्साहन मिळते आणि पोटावरील चरबी ही कमी होते. हेल्थ एक्सपर्ट्सनुसार, भुक कमी करणे आणि वजन कमी करण्याची प्रक्रिया फार वेगाने करते. हे ड्रिंक तयार करण्यासाठी सर्वात प्रथम एका ग्लासात जिरं टाकून रात्रभर भिजत ठेवा. सकाळी हे पाणी गॅसवर उकळवा आणि कोमट झाल्यानंतर ते पाणी प्या. (Belly fat loss tips)

लिंबू पाणी
सकाळी उठून एक ग्लास कोमट पाण्यात लिंबाचा रस टाका. यामुळे शरिरात बदल दिसून येऊ शकतात. लिंबू पाणी अँन्टिऑक्सिडेंट आणि पेक्टिन फायबरयुक्त असते. ज्यामुळे पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते. ड्रिंक तयार करण्यासाठी एक ग्लास पाणी प्या, त्यात थोडं लिंबूचा रस आणि एक चमचा मधं टाका. मेटाबॉलिज्म वाढवण्यासाठी आणि अतिरिक्त वजन कमी करण्यासाठी सकाळी उपाशी पोटी प्या.

ओव्याचे पाणी
ओव्यात मेटाबॉलिज्मला प्रोत्साहन देण्यास मदत करतात. ओवा पचनक्रिया सुरळीत होते आणि पोषक तत्वांचे उत्तम अवशोषण करण्यास मदत मिळते. हे ड्रिंक तयार करण्यासाठी दोन चमचे भाजलेला ओवा एका गरम पाण्यात रात्रभर भिजवून ठेवा. सकाळी उठून ते गॅसवर उकळवा आणि कोमट झाल्यानंतर त्यात मधं टाकून ते प्या.


हेही वाचा- महिलांना का आवडतात आंबट पदार्ध, रक्तातच दडलंय secret

- Advertisment -

Manini