ड्रायफ्रुट्स मधला महत्वाचा पदार्थ म्हणजे बदाम. बदाम हे फळ लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सगळेजण खातात. बदामात असेलेले पौष्टिक घटक शरीराला ऊर्जा देतात. बुद्धीला चालना देण्यासाठी बदामाचे सेवन अतिशय उपयुक्त आहे. बदामात अनेक पोषक तत्व, अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्व , खनिजे असतात. बदामामध्ये विटामीन-ई सुद्धा मोठ्या प्रमाणात आढळते. नियमीत बदाम खाल्ल्याने हाडं मजबूत होतात आणि बुद्धी तल्लख होते. बदामाचा वापर इतर मिठाईतही केला जातो. पण खरंतर भिजलेले बदाम हे कच्च्या बदामापेक्षा जास्त पोषक असतात. यामुळे आपल्याला अधिक प्रमाणात पोषक तत्व मिळतात.
भिजवलेले बदाम खाण्याचे फायदे
दररोज नियमीत भिजलेले बदाम खाल्ल्याने पचनशक्ती मजबूत होते. भिजलेल्या बदामामध्ये विटामीन-बी भरपूर प्रमाणात आढळते, ज्यामुळे वेगवेगळया प्रकारच्या आजारांपासून लढण्यासाठी मदत होते.
- ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते
भिजलेले बदाम खाल्ल्याने ब्लड प्रेशर नियंत्रणात राहायला मदत होते.
- वजन कमी करण्यासाठी उपयुक्त
जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर, तुम्ही तुमच्या डाइट मध्ये भिजलेल्या बदामाचा वापर नक्की करा.
- पचनशक्ती मजबूत होते
भिजलेले बदाम खाल्ल्याने पचनशक्ती मजबूत होते
- त्वचा चमकदार बनते
भिजलेले बदाम खाल्ल्याने त्वचा चमकदार होऊन चेहरा तजेलदार दिसतो.
- हृदय निरोगी राहते
भिजलेले बदाम खाल्ल्याने हृदय मजबूत होते, यामुळे शरीरातील खराब कोलेस्ट्रोल चा स्तर कमी होतो.
- इम्यूनिटी वाढते
भि़जलेले बदाम खाल्ल्याने इम्यूनिटी वाढते, रोगप्रतिकारशक्ती वाढते.