योग करणे शरीरासाठी फायद्याचे असते. योगाचा नियमित सराव शरीराला विविध आजारांपासून दूर ठेवण्यासाठी उपयुक्त ठरतो. बदलत्या लाइफस्टाइलनूसार हल्ली बऱ्याच महिलांना आरोग्याच्या विविध तक्रारी जाणवत आहेत. त्यामुळे हल्ली बरेच जण योगा किंवा मेडीटेशन करताना दिसतात. योगा सराव करताना तुम्ही दररोज अनुलोम – विलोम करायला हवा. महिलांनी तर आवर्जून अनुलोम – विलोम करायला हवा. अनुलोम – विलोम करणे महिलांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. जाणून घेऊयात, महिलांनी अनुलोम- विलोम केल्याने कोणते फायदे होतात.
अनुलोम- विलोम करण्याचे फायदे –
दररोज सकाळी फक्त 5 ते 10 मिनीटे महिलांनी अनूलोम – विलोम केल्यास तुम्हाला तणावापासून मुक्ती मिळू शकते. जर तुम्ही स्ट्रेसच्या समस्येने हैराण झाले असाल तर सकाळी उठल्यावर थोडावेळ का होईना अनूलोम – विलोम करण्याची सवय लावा. या सवयीमुळे नक्कीच फायदा होईल.
जर तुम्हाला निद्रानाशेची समस्या जाणवत असेल तर तुमच्या डेली रूटीनमध्ये अनूलेम विलोम करण्याची सवय लावायला हवी. अनुलोम – विलोम करण्याच्या रोजच्या सवयीमुळे तुमची निद्रानाशेची समस्या नक्कीच कमी होण्यास मदत होईल.
रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी अनुलोम विलोम करणे फायद्याचे ठरते. जर तुम्हाला वारंवार वायरल इनफेक्शन होत असेल तर यामागे कुठेतरी तुमची रोगप्रतिकारशक्ती कमी असू शकते. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी दररोज अनुलोम – विलोम करण्याची सवय अंगी बाळगा.
बदलत्या लाइफस्टाइलनुसार डोळ्यांचे आरोग्य कठीण झाले आहे. डोळ्यांच्या विविध तक्रारी जाणवत आहे. कमी वयातच लहान मुलांना चष्मे लागणे, धूसर दिसणे अशा तक्रारी जाणवत आहेत.
हेही पाहा –
Edited By – Chaitali Shinde