सफरचंदाला पोषकतत्वांचा खजिना म्हटले आहे. तज्ञांकडून सुद्धा दररोज एक सफरचंद खाण्याचा सल्ला दिला जातो. सफरचंदामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी, फायबर आढळते, ज्यामुळे पचन सुरळीत होते, इम्युनिटी बुस्ट होण्यास मदत मिळत. जाणून घेऊयात, असे बहुगुणीसंपन्न सफरचंद नाष्ट्यात खाल्लाने शरीराला कोणते फायदे होतात.
दररोज सफरचंद खाण्याचे फायदे –
- सफरचंदामध्ये फायबर आढळते, ज्यामुळे पोट दिर्घकाळ भरलेले राहते. पोट दिर्घकाळ भरलेले राहिल्याने तुम्ही कमी खाता. परिणामी, वजन कंट्रोलमध्ये राहते.
- सफरचंदामध्ये कमी कॅलरी असतात. त्यामुळे डाएटमध्ये तुम्ही याचा समावेश करू शकता.
- सफरचंदातील गुणधर्म शरीरातील मेटॅबॉलिझम वाढवण्यासाठी फायदेशीर असतात. जेव्हा शरीराचे मेटॅबॉलिझम वाढते तेव्हा वजन कंट्रोलमध्ये राहते.
- सफरचंदातील फ्रुक्ट्रोज रक्तातील साखर वाढू देत नाही. ज्यामुळे इन्सुलिनची पातळी नियंत्रणात राहते आणि वजन वाढण्याचा धोका कमी होतो.
- सफरचंदात पेक्टिन नावाचे विरघळणारे फायबर असते, जे रक्तातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते.
- सफरचंद खाल्लाने हृदयविकाराचा धोका कमी होतो. सफरचंदातील ऍटीऑक्सिडंट फ्रि रॅडिकल्सशी लढतात, जे हृदयाला कोणत्याही प्रकारची हानी पोहोचनत नाही आणि हृदयविकाराचा धोका होतो.
- सफरचंदात असलेले फायबर पचनसंस्था निरोगी ठेवते आणि बद्धकोष्ठता,पोटाच्या तक्रारी कमी करतात.
- सफरचंदातील साखर दिवसभर तुम्हाला उर्जावान ठेवण्यासाठी फायदेशीर असते.
- सफरचंदातील पोटॅशियम ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करते. त्यामुळे सकाळच्या नाष्ट्यात तुम्ही सफरचंद खायला हवे.
- नियमित सफरचंद खाल्ल्याने त्वचा निरोगी राहते आणि चमकदार बनते.
- एका रिसर्चनुसार, सफरचंदाच्या सेवनाने फुफ्फुसाचा, ब्रेस्टच्या कॅन्सरचा धोका कमी होतो.
- सफरचंद खाल्ल्याने हाडे मजबूत होतात.
- सफरचंद नाष्ट्यात दररोज खाल्याने दात मजबूत होतात.
- तुम्हाला जर किडनी स्टोनचा त्रास असेल तर सफरचंद तुम्ही खायला हवे. सफरचंदाच्या नियमित सेवनाने हा त्रास नक्कीच कमी होऊ शकतो.
- नियमित सफरचंदाच्या सेवनाने वृद्धांमध्ये आढळणारे पार्किन्सन्स, स्मृतिभ्रंश आजाराचा धोका कमी होतो.
सफरचंद कसे खावे?
- सफरचंद उपाशीपोटी खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होतात.
- सफरचंद कायम सालीसकट खावे, कारण फळाच्या सालीत पोषकतत्वे आढळतात.
- सफरचंद तुम्ही इतर फळांसोबत खाऊ शकता.
हेही पाहा –
Edited By – Chaitali Shinde