उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अशा परिस्थितीत बेलफळाचे ज्युस प्यायलास अनेक फायदे मिळू शकतील. बेलफळात नैसर्गिकरित्या थंड गुणधर्म असल्याने उन्हाळ्यात शरीराला थंडावा मिळण्यासाठी बेलफळाचे ज्युस
ज्यूस पिणे उपयुक्त ठरते. बेलफळाचा ज्यूसने शरीर दिवसभर हायड्रेट राहण्यास मदत होते. बेलफळाच्या ज्यूसमध्ये व्हिटॅमिन सी, बीटा कॅरोटीन, थायमिन आणि रायबोफ्लेवीन आदी पोषक तत्त्वे आढळतात. जाणून घेऊयात, बेलफळाचे ज्युस पिण्याने शरीराला आणखी कोणते फायदे होतात
बेलफळाच्या ज्यूसचे फायदे
शरीर हायड्रेट राहते –
उन्हाळ्यात बेलफळाच्या ज्यूसमुळे शरीर आतून थंड आणि हायड्रेट राहते. उन्हाळ्यात जाणवणारी डिहायड्रेशनची समस्या दूर ठेवण्यासाठी बेलफळाचा ज्यूस उपयुक्त ठरतो.
पचन व्यवस्थितिरित्या होते –
बेलफळाचा ज्यूसमुळे पचनाशी निगडित समस्या आणि बद्धकोष्ठतेच्या त्रासापासून सुटका होते. त्यामुळे उन्हाळ्यात दररोज बेलफळाचा ज्यूस प्यावा असे सांगितले जाते.
एनर्जी बूस्टर –
बेलफळाचा ज्यूसमुळे शरीर ऍक्टिव्ह राहते आणि शरीरातील ऊर्जेची लेवल सुधारण्यासाठी मदत होते. परिणामी, तुमची सुस्ती कमी होते.
उष्णतेवर मात करते –
उष्णतेमुळे अनेकदा तोंडात फोड येतात. अशावेळी तुम्हाला बेलफळाचा ज्यूस पिणे फायदेशीर ठरेल. बेलफळ थंड असल्याने शरीर थंड राहते आणि तोंडात उष्णतेच्या फोडी येत नाही.
इम्युनिटी बूस्टर –
बेल फळामध्ये व्हिटॅमिन C मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे इम्युनी सिस्टीम मजबूत करण्यासाठी बेलाचे फळ उपयुक्त ठरते. तसेच जर उन्हाळ्यात तुम्ही बेलफळाचा ज्यूस प्यायलात तर याच्या सेवनामुळे अनेक आजार आणि इन्फेक्शन दूर राहतात.
डिटॉक्सिफिकेशन –
बेलफळाचा ज्यूस नॅचरल डिटॉक्सीफायर म्हणून काम करतो, जो शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकतो. ज्याने त्वचा चमकदार होते.
हेही पाहा : Sitting on Floor Benefits : जमिनीवर बसणे आरोग्यासाठी कसे फायद्याचे ठरते, पहा संपूर्ण व्हिडीओ !
Edited By – Chaitali Shinde