भरपूर पाणी प्यायला हवे असे आपण अनेकदा ऐकतो. यामुळे वजन कमी करण्यात खूप मदत होऊ शकते.
पाणी प्यायल्याने शरीरातील पचनक्रिया सुरळीत ठेवण्यास मदत होते आणि अतिरिक्त वजन कमी करणेदेखील सोपे होते. पण अनेकांना रोज पाणी पिणे आवडत नाही. याच साध्या पाण्याचा स्वाद वाढवता आला तर ? आणि हे पाणी अधिकच आरोग्यदायी बनवता आले तर ? हे नक्कीच शक्य आहे. आपण अशाप्रकारे दुहेरी फायदा मिळवू शकतो. स्वयंपाकघरातील एक साधासा घटक हे काम उत्तमरित्या करू शकतो. तो घटक म्हणजेच मसाल्याचा पदार्थ म्हणून ओळखला जाणारा आणि हमखास चहामध्ये वापरला जाणारा पदार्थ अर्थात ‘वेलची’. आजच्या या लेखातून जाणून घेऊयात या वेलचीचे पाणी करून प्यायल्यास नेमके कोणते फायदे मिळू शकतात आणि हे पाणी कसे तयार करावे याविषयी.
वेलचीचे पाणी कसे बनवायचे?
5 ते 6 वेलची सोलून रात्रभर ग्लासभर पाण्यात भिजवून ठेवा. हे पाणी सकाळी गरम करा. हे पाणी दिवसातून 3 ते 4 वेळा प्यायल्याने तुमचे वजन बऱ्याच अंशी कमी होईल. तुम्ही एका दिवसात सुमारे 1 लीटर कोमट वेलची पाणी पिऊ शकता. जर तुम्ही हे 14 दिवस नियमित केले तर तुम्हाला याचे परिणाम दिसू लागतील.

वेलचीचे पाणी का?
रोज वेलचीचे पाणी प्यायल्याने फूड क्रेविंग्स कमी होण्यास मदत होते. हे जास्त खाणे किंवा अनहेल्दी फूडची लालसा टाळण्यास मदत करते. वेलचीचे पाणी प्यायल्याने त्वचेलाही खूप फायदा होतो, त्यामुळे त्वचा चमकदार होते.
वेलचीचे पाणी पिण्याचे फायदे :
वेलचीमध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि कॅल्शियम असते.जे आरोग्यासाठी खूप चांगले असते. शरीरातील चरबी जाळण्याव्यतिरिक्त, वेलचीचे इतरही अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.
-वेलचीमध्ये अँटिऑक्सिडेंट्स असतात आणि त्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते.
-एका संशोधन अहवालानुसार, वेलचीमध्ये अशी संयुगे असतात जी कर्करोगाशी लढण्यास मदत करतात.
– वेलचीचे सेवन केल्याने पचनाच्या समस्या दूर राहण्यास मदत होते.
– वेलची श्वासाच्या दुर्गंधीवर उपचार करण्यास मदत करते. हे तोंडातील बॅक्टेरिया नष्ट करते आणि दातात होणारी कॅविटी टाळण्यासही मदत करते.
– हाय ब्लड शुगर लेव्हल कमी करण्यासाठी देखील वेलची उपयुक्त आहे.
हेही वाचा : New Born Baby : नवजात बाळ का रडते?
Edited By – Tanvi Gundaye