Tuesday, February 18, 2025
Homeमानिनीपावसाळ्यात मका का खायचा?

पावसाळ्यात मका का खायचा?

Subscribe

पावसाळा सुरु झाला आहे. या दिवसात आपल्याला आजूबाजूला मक्याचे कणीस हातगाड्यांवर हमखास दिसते. मक्याचे कणीस खायला जेवढं स्वादिष्ट आहे तेवढंच ते आरोग्यासाठीही फायदेशीर असते. मक्याच्या कणसात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन इ, मिनरल आणि अँटीऑक्सीडेंट्स पौष्टीक घटक असतात. जे आरोग्याच्या अनेक समस्या दूर करतात. यासह कणसात फायबर सुद्धा असते. जाणून घेऊयात मका खाण्याचे फायदे ,

अशक्तपणाच्या तक्रारी दूर होतात –

अशक्तपणाची समस्या प्रामुख्याने महिलांमध्ये आणि लहान मुलांमध्ये दिसून येतो. अशक्तपणाचे प्रमुख लक्षण म्हणजे थकवा जाणविणे. अशावेळी तुम्हाला मका खाणे फायद्याचे ठरते. यामुळे शरीरात लाल पेशी तयार होण्यास मदत मिळते. तसेच यातील पोषक घटकांमुळे रक्ताची कमतरता देखील दूर होते.

व्हिटॅमिन्सने समृद्ध –

मका व्हिटॅमिन बी ने समृद्ध असतो, जे केस आणि हाडांच्या आरोग्यासाठी महत्वाचे असते. याशिवाय यात व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात असते, जे इम्युनिटी पॉवर वाढविण्यासाठी उपयुक्त ठरते.

डोळे –

मक्याचे कणीस खाल्याने डोळ्यांचे आरोग्य राखण्यास मदत होते. यातील व्हिटॅमिन ए आणि बीटा कॅरोटीन सारखे पोषक घटकांमुळे दृष्टी सुधारण्यास फायदेशीर ठरतात. जर तुम्ही मका रोज खाल्लात तर याने डोळ्यांशी संबंधित आजार होण्याचा धोका कमी होतो.

त्वचेसाठी फायदेशीर –

यात बीट कॅरोटिनचे प्रमाण जास्त असते. यामुळे डोळ्यांसह त्वचेचे आरोग्य राखतात. तसेच यातील अँटीऑक्सीडेंट्समुळे वृद्धत्वाच्या समस्येवर मात करण्यास मदत होते.

वेट लॉससाठी फायदेशीर –

मक्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे जेव्हा आपण मका खातो तेव्हा बराच काळ आपले पोट भरलेले राहते. जर तुमचे पोट भरलेले असेल तर तुम्ही आपसूकच कमी खाणार. ज्यामुळे तुमचे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.

 

 

 


हेही पाहा : Home Remedies for Hypertension : हायपरटेन्शनवरील घरगुती उपाय

Edited By – Chaitali Shinde

Manini